शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

राष्टवादी-शिवसेनेतच दिंडोरीत खरी चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 01:19 IST

दिंडोरी - पेठ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या दोन दिग्गज माजी आमदारांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवाराने सुटकेचा नि:श्वास सोडला

दिंडोरी : दिंडोरी - पेठ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या दोन दिग्गज माजी आमदारांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवाराने सुटकेचा नि:श्वास सोडला असून, दिंडोरीत एकूण पाच उमेदवार रिंगणात असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवाळ व शिवसेनेचे भास्कर गावित यांच्यात सरळ काट्याची लढत रंगणार आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत युती - आघाडी तुटल्याने सर्व पक्षांचे उमेदवार होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपसह दहा उमेदवार रिंगणात होते; मात्र खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसमध्ये झाली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती. यंदा राष्ट्रवादीला शिवसेनेचे आव्हान होते, मात्र शिवसेनेत इच्छुकांची मोठी भाऊगर्दी होती. त्यातच लोकसभेत राष्ट्रवादीकडून उमेदवारी केलेले धनराज महाले यांनी घरवापसी करत शिवसेनेची उमेदवारी मिळवली होती मात्र इच्छुक रामदास चारोस्कर व भास्कर गावित यांच्यासह संघटनेतील नाराजी नात्यानंतर उमेदवारी बदल करत भास्कर गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती यानंतर धनराज महाले व रामदास चारोस्कर यांनी अपक्ष अर्ज दाखल करत आपले आव्हान कायम ठेवले होते; मात्र अखेर त्यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे भास्कर गावित यांना काहीसा दिलासा मिळाला आहे त्यांना आता आमदार नरहरी झिरवाळ यांचा सरळ सामना करावा लागणार आहे.वंचित आघाडीचे अरुण गायकवाड यांचेही आव्हान राहणार आहे. दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी २६९२०५ मतदार होते, तर यावेळी ३०१४० मतदार वाढत एकूण २९९३४५ मतदार आहे.यात दिंडोरी तालुक्यात 216414 तर पेठ तालुक्यात 82931 मतदार आहे.रिंगणातील उमेदवारनरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी काँग्रेस), भास्कर गावित (शिवसेना), अरु ण गायकवाड (वंचित बहुजन आघाडी), टिकाराम बागुल (मनसे), जना वतार (बसपा)२०१४ मध्ये होते१० उमेदवार ।यंदा आहेत एकूण ५ उमेदवार

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019dindori-acदिंडोरीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस