राष्ट्रवादीच्या बैठकीत मनपा निवडणुकीवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:17 IST2021-06-09T04:17:37+5:302021-06-09T04:17:37+5:30
बैठकीच्या प्रारंभी यावेळी युवक पदाधिकारी शिवराज ओबेरॉय यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आगामी नाशिक मनपा निवडणूक तयारीसाठी तसेच १० ...

राष्ट्रवादीच्या बैठकीत मनपा निवडणुकीवर चर्चा
बैठकीच्या प्रारंभी यावेळी युवक पदाधिकारी शिवराज ओबेरॉय यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आगामी नाशिक मनपा निवडणूक तयारीसाठी तसेच १० जून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापनदिन असून शहरात कार्यक्रम रूपरेषा आखण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे राष्ट्रवादी भवन येथे बैठक घेण्यात आली. जवळपास दीड वर्षापासून कोरोना महामारीने देशात थैमान घातले असून, नाशिकमध्ये रुग्ण वाढत होते. सद्यस्थितीत कोरोनाला आळा घालण्यात सर्वांना यश प्राप्त होत असून जनजीवन पूर्ववत होत आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असल्यास आगामी मनपा निवडणुक वेळेत होण्याची शक्यता असल्याने मनपात सत्ता काबीज करण्यासाठी त्याची रूपरेषा मांडण्यासाठी युवक राष्ट्रवादीची आढावा बैठक घेतली.
या बैठकीला जय कोतवाल, नितीन निगळ, राहुल तुपे, सोनू वायकर, विशाल डोखे, नीलेश भंदुरे, सागर बेदरकर, संतोष जगताप, राहुल कमानकर, कल्पेश कांडेकर, डॉ. संदीप चव्हाण, किरण पानकर, संतोष भुजबळ, नवराज रामराजे, रेहान शेख, हर्शल चव्हाण, विशाल माळेकर, अविनाश मालुंजकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.