नाशिक- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सेवानिवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर नाशिक मधील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असून त्यांनी कुठल्याही परिस्थितीत शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा ठरावही त्यांनी केला आहे. मुंबईमध्ये आज आयोजित एका कार्यक्रमात शरद पवार यांनी सेवा निवृत्तीचा निर्णय जाहीर केला त्यानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी भवन कार्यालयामध्ये कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या अध्यक्षते झालेल्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा असा ठराव शहर कार्यकारिणीने एकमुखाने केला आहे
नाशिक मधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या पाठीशी, सेवानिवृत्तीचा निर्णय मागे घेण्याचा ठराव
By संजय पाठक | Updated: May 2, 2023 19:30 IST