नायगाव सरपंचासह सदस्यांचा भाजपात प्रवेश

By Admin | Updated: October 30, 2016 02:27 IST2016-10-30T02:27:28+5:302016-10-30T02:27:53+5:30

नायगाव सरपंचासह सदस्यांचा भाजपात प्रवेश

Naygaon Sarpanch with members of BJP | नायगाव सरपंचासह सदस्यांचा भाजपात प्रवेश

नायगाव सरपंचासह सदस्यांचा भाजपात प्रवेश

सिन्नर : नायगावच्या सरपंच इंदुमती मुरलीधर कातकाडे यांच्यासह उपसरपंच अनिता सुनील जेजुरकर व सदस्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. सिन्नर येथील भगवती मंगल कार्यालयात भाजपाचा मेळावा पार पडला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव, सरचिटणीस बापूसाहेब पाटील, तालुकाध्यक्ष सुनील केकाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच कातकाडे यांच्यासह उपसरपंच जेजुरकर, ग्रामपंचायत सदस्य रोशन गायकवाड, अनिता काकड, मंगला पिंपळे, आशा कदम या सदस्यांसह संगीता बुटे, गोदा युनियनचे संचालक संतू पानसरे, दत्तात्रय गरकळ, मुरलीधर कातकाडे, डॉ. राजेेंद्र चव्हाण, गोविंद कदम, चंद्रभान पिंपळे, रामभाऊ कदम, किसन बर्के, रमेश डोमाडे, विलास खालकर व अशोक जेजुरकर यांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी नगराध्यक्ष अश्विनी देशमुख, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, दिगंबर देशमुख, अरुण वाघ, सोमनाथ भिसे, भाजपा शहराध्यक्ष पंकज जाधव, जयंत आव्हाड, दिलीप शिंदे, महिला तालुकाध्यक्ष सविता कोठुरकर, भाऊसाहेब शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
 

Web Title: Naygaon Sarpanch with members of BJP