शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
3
"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी
4
"मी रुतबीला फिरायला नेतो..."; दीड वर्षांच्या लेकीला वडिलांनी फेकलं नदीत, हवा होता मुलगा
5
होम लोन स्वस्त आणि पर्सनल लोन महाग का असतं? बँका का ठेवतात व्याजदरात फरक, जाणून घ्या
6
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
7
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
8
Mumbai: वर्षाभरात ६१ क्लास वन अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात; तरीही २०९ लाचखोरांचे निलंबन नाही!
9
दिल्ली स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठ रडारवर; 200 हून अधिक शिक्षक-डॉक्टरांची चौकशी
10
सिबिल स्कोअर कमी आहे? काळजी करू नका! 'या' ५ मार्गांनी तुम्हाला कमी स्कोअरवरही मिळू शकते कर्ज
11
Gold Silver Price 20 Nov: सोन्या-चांदीचे दर धडाम, Silver २२८० रुपयांनी स्वस्त; Gold मध्येही मोठी घसरण, पाहा नवे दर
12
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'नवीन सरकारने आपली आश्वासने पूर्ण करावीत'
13
"मी मुलींसारखा चालायचो आणि बोलायचो", करण जोहरचा मोठा खुलासा, म्हणाला- "पुरुषांसारखं बोलण्यासाठी मी ३ वर्ष ..."
14
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
15
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
16
Crime: भाचीचा लग्नासाठी तगादा अन् मामा संतापला; धावत्या रेल्वेतून ढकलले!
17
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
18
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
19
Social Media: 16 वर्षाखाली मुलांचे इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट बंद होणार, मेटाने ऑस्ट्रेलियासाठी का घेतला निर्णय?
20
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सव : कालिका देवी मंदिर परिसरातून दोघी महिला चोर ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 16:17 IST

कालिकादेवी यात्रोत्सवानिमित्त मुंबईनाका परिसरातील मंदिराभोवती पोलीस आयुक्तालयाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. साध्या वेशातील पोलीसदेखील याठिकाणी तैनात आहे

ठळक मुद्देपोलिसांना महिला टोळीचा संशयपोलिसांनी महिलांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी सुरू केली

नाशिक : नवरात्रनिमित्त शहराच्या ग्रामदेवता मानल्या जाणाऱ्या कालिकादेवीचा यात्रोत्सव सध्या सुरू आहे. भाविकांची मंदिरात पहाटसमयी व सायंकाळी दर्शनासाठी गर्दी उसळत आहे. याचा फायदा घेत औरंगाबादच्या दोघा महिला चोरांनी भाविकांच्या वेशात मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करत मंगळवारी (दि.१) सकाळी एका महिलेचे मंगळसूत्र या चोरट्या महिलेने लांबविले. जागरूक महिलेने त्या चोरट्या महिलेस धरून संशयावरून पोलिसांच्या हवाली केले. दुसºया एका महिला भाविकाच्या हातातून मोबाइल हिसकावून पळणा-या महिला चोरासदेखील बंदोबस्तावरील महिला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले. या दोन्ही महिला औरंगाबादच्या असल्याचे तपासात पुढे आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कालिकादेवी यात्रोत्सवानिमित्त मुंबईनाका परिसरातील मंदिराभोवती पोलीस आयुक्तालयाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. साध्या वेशातील पोलीसदेखील याठिकाणी तैनात आहे. तसेच २४ तास पोलिसांकडून मदत केंद्र उभारून सातत्याने भाविकांना सावधानतेच्या सूचना ध्वनिक्षेपकावरून पोलीस देत आहेत. त्यामुळे भाविक गर्दीमध्येदेखील सावध राहत आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास एका मंगळसूत्र चोरी करणाºया महिलेला भाविक महिलेने ओळखून पोलिसांच्या हवाली केले. तसेच दुस-या घटनेत सकाळी एक महिला चोर भाविकाच्या हातातील मोबाइल हिसकावून गर्दीतून पळ काढताना सुरक्षारक्षकांच्या नजरेस आली. तत्काळ महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. संशयित रोशनी संतोष चव्हाण (२०, रा. सिल्लोड, औरंगाबाद), चिंगू अशोक भोसले (२२,रा. औरंगाबाद रेल्वे स्थानक परिसर) या अंगझडती घेतली असता महिला पोलिसांना ५ ग्रॅम वजनाची १५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, १८ हजार रुपये किमतीचा मोबाइल मिळून आला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात दोघा महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अंकुश जाधव हे करीत आहेत.पोलिसांना महिला टोळीचा संशयऔरंगाबादच्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या अजून कोणी महिला, पुरुष साथीदार अथवा टोळीचा कालिका यात्रोत्सव, भगूरच्या रेणुका देवी यात्रोत्सवात शिरकाव झालेला आहे का, याचीही चाचपणी पोलीस प्रशासनाकडून केली जात आहे. याप्रकरणी बंदोबस्तावर असलेल्या सर्व पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. साध्या वेशातील पोलीसदेखील यात्रेत होणाºया गर्दीवर लक्ष ठेवून आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीNashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी