नवरात्रोत्सवात वाहतूक मार्गात बदल

By Admin | Updated: September 30, 2016 02:43 IST2016-09-30T02:13:02+5:302016-09-30T02:43:59+5:30

कालिका यात्रा : सकाळ - संध्याकाळ राहणार जुना आग्रारोड बंद

Navratri festival changes in the way | नवरात्रोत्सवात वाहतूक मार्गात बदल

नवरात्रोत्सवात वाहतूक मार्गात बदल

 नाशिक : सालाबादप्रमाणे येत्या शनिवार (दि.१) पासून शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखली जाणारी कालिका देवीची यात्रा सुरू होत आहे. यानिमित्त मुंबई नाक्याकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली असून, गडकरी चौक व चांडक सर्कल येथून पुढे सकाळी व संध्याकाळी मार्गस्थ होता येणार नसल्याची अधिसूचना शहर वाहतूक नियंत्रण विभागाने जाहीर केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येत्या एक तारखेपासून मोडक चौक सिग्नलपासून महामार्गापर्यंत व महामार्गापासून मोडक सिग्नलपर्यंतचा रस्ता, चांडक सर्कल ते महामार्ग हे रस्ते पहाटे पाच ते दुपारी बारा व संध्याकाळी पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
एसटी बसेससह सर्व प्रकारची हलकी व जड वाहने मोडक सिग्नलवरून खडकाळी सिग्नलमार्गे साठफुटी रोडने द्वारकेवरून सिडको व नाशिकरोडकडे जातील. तसेच मुंबई नाक्यावरून येणारी हलकी वाहने महामार्ग बसस्थानकमार्गे चांडक सर्कलकडे जातील. शहरातून अंबड, सातपूर परिसरात जाणारी सर्व जड वाहने ही द्वारकेवरून गरवारे सर्कलमार्गे सातपूर औद्योगिक वसाहतीतून पुढे जातील. द्वारकेवरून पंचवटीत जाणारी जड वाहने ही कन्नमवार पुलावरून रासबिहारी शाळेच्या मार्गाने पंचवटीमध्ये जातील.
सारडा सर्कलवरून गडकरी चौकाकडे येणारी वाहने एन. डी. पटेल रोडवरून मोडक सिग्नलमार्गे पुढे जातील. वरील सर्व प्रकारचे निर्बंध हे पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशामक बंबांसाठी लागू नसणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. भाविकांनी या वाहनांसाठी रस्ता खुला करून द्यावा, असे आवाहन पोलीस उपआयुक्त विजय पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Navratri festival changes in the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.