नाशिक : गोविंदनगर, इंदिरानगर, गंगापूररोड, उपनगर, सातपूर या भागात सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यास पोलिसांना अद्याप यश येत नसल्याने महिलावर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गणेशोत्सवकाळातही सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आगामी नवरात्रोत्सव तोंडावर आला असताना पुन्हा सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना घडू लागल्याने महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी (दि.२१) गोविंदनगर येथे रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास ज्योती सुहास सोनवणे (४४) या गृहिणी भाजीपाला खरेदी करून घरी पायी जात होत्या. यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा तरूण चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी समोरून हिसकावून पळ काढला. सुमारे ३० हजार रूपये किंमतीची एक तोळ्याची सोनसाखळी चोरी झाल्याची फिर्याद सोनवणे यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरिक्षक चेतन श्रीवंत करीत आहेत.
नवरात्रोत्सव तोंडावर : २० दिवसांत ७ चेन स्नॅचिंग; पोलिसांपुढे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 14:18 IST
जेमतेम पाच ते सहा दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. नवरात्रोत्सवात महिला, युवती मोठ्या संख्येने सकाळी आणि रात्री घराबाहेर पडतात.
नवरात्रोत्सव तोंडावर : २० दिवसांत ७ चेन स्नॅचिंग; पोलिसांपुढे आव्हान
ठळक मुद्देकालिकामातेच्या दर्शनासाठी महिला पहाटे पायी दाखल होतातगणेशोत्सवकाळातही सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या महिलावर्गात तीव्र नाराजी व्यक्त