शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्र उत्सव हरिनाम सप्ताहाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 19:04 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे नवरात्र उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह होत असतो. या सप्ताहाला शंभर वर्षांची परंपरा आहे. यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे शासन नियमांचे पालन करत निवडक उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला. कोरोनाकाळातही घोटी शहराने अध्यात्माची परंपरा कायम ठेवून शिस्त, अध्यात्म व संस्कृतीचा त्रिवेणी संगम घडवला असल्याचे मत कीर्तनकारांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकोरोनाकाळातही घोटी शहराने जपली अध्यात्माची आदर्श परंपरा

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे नवरात्र उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह होत असतो. या सप्ताहाला शंभर वर्षांची परंपरा आहे. यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे शासन नियमांचे पालन करत निवडक उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला. कोरोनाकाळातही घोटी शहराने अध्यात्माची परंपरा कायम ठेवून शिस्त, अध्यात्म व संस्कृतीचा त्रिवेणी संगम घडवला असल्याचे मत कीर्तनकारांनी व्यक्त केले.घोटीत बुधवारी (दि.२८) नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप काल्याच्या कीर्तनाने व निवडक भाविकांच्या उपस्थितीत दिंडी सोहळ्याने झाला. गुलाब महाराज खालकर यांनी काल्याचे कीर्तन केले.येथील हरिनाम सप्ताहाला १०६ वर्षांची परंपरा आहे. कोरोनाकाळात झालेल्या सप्ताहात राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने झाली. फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर व मास्कचा वापर करीत निवडक भाविकांना उपस्थितित सप्ताह पार पडला.सप्ताहात ह.भ.प. जयंत महाराज गोसावी, भगीरथ काळे, संजयनाना धोंगडे, एकनाथ महाराज सदगीर, जगन्नाथ पाटील, उमेश दशरथे, धनंजय गतीर, जगदीश जोशी, मठाधिपती माधव महाराज घुले, कोमलसिंह राजपूत, अनिल तुपे यांची कीर्तने झाली.सांगतेला शहरातून नगरप्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी हरिनामाचा गजर करण्यात आला. महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. 

 

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीSocialसामाजिक