वडाळीभोईच्या उपसरपंचपदी नवनाथ जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:24 IST2020-01-11T23:30:06+5:302020-01-12T01:24:42+5:30
वडाळीभोई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नवनाथ जयराम जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. उपसरपंच निवृत्ती घाटे यांनी रोटेशन पद्धतीने राजीनामा दिल्याने या रिक्त जागी ही निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच अनिता सुखदेव जाधव होत्या. यावेळी कादवाचे संचालक सुखदेव जाधव यांनी नवनाथ जाधव यांचा सत्कार केला.

चांदवड तालुक्यातील वडाळीभोईच्या उपसरपंचपदी नवनाथ जाधव यांच्या निवडीनंतर सत्कार करताना कादवाचे संचालक सुखदेव जाधव, सरपंच अनिता जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ.
चांदवड : तालुक्यातील वडाळीभोई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नवनाथ जयराम जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.
उपसरपंच निवृत्ती घाटे यांनी रोटेशन पद्धतीने राजीनामा दिल्याने या रिक्त जागी ही निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच अनिता सुखदेव जाधव होत्या. यावेळी कादवाचे संचालक सुखदेव जाधव यांनी नवनाथ जाधव यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच अनिता जाधव, सदस्य निवृत्ती घाटे, रामनाथ आहेर, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, नामदेव आहेर, बाळासाहेब केदारे, सुभाष गांगुर्डे, कल्याबाई आहेर, मीराबाई जाधव, सरला जाधव, सुमन निफाडे, लक्ष्मीबाई आहेर, शोभा आहेर आदी उपस्थित होते.
नवनाथ जाधव यांनी गावाच्या विकासासाठी काम करू, असे आश्वासन दिले. यावेळी महेश जाधव, राजेंद्र जाधव, प्रमोद जाधव यांची भाषणे झाली, तर व्यंकट जाधव, वसंत जाधव, दत्तू जाधव, अशोक जाधव, महेश जाधव, लहानू जाधव, अरुण जाधव, दत्तू पवार, शिवाजी आहेर, शैलेश जाधव, शंकर निफाडे, भाऊसाहेब जाधव, पोपट अहेर, बंडू चव्हाण, योगेश जाधव, ललित संचेती, सुमती संचेती आदी उपस्थित होते.