नवरात्र उत्सवाची देवगाव येथे सांगता
By Admin | Updated: October 7, 2014 00:42 IST2014-10-07T00:41:54+5:302014-10-07T00:42:24+5:30
नवरात्र उत्सवाची देवगाव येथे सांगता

नवरात्र उत्सवाची देवगाव येथे सांगता
देवगाव : पंचक्रोशीचे कुलदैवत देवी जगदंबा भवानी मंदिरात नवरात्रोत्सवाची भंडाऱ्याने उत्साहात सांगता करण्यात आली. नवरात्र उत्साहाच्या पहिल्या दिवसापासून देवी मंदिरात परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. रात्रंदिन परिसर गजबजून गेला होता. दिवसा नवस फेडणाऱ्यांची, तर रात्री वाघ्या-मुरळीचा कार्यक्रम यामुळे परिसर भक्तिपूर्ण झाला होता. नवरात्र उत्सवानिमित्त गावातील नवभारत मित्रमंडळाने देवीची प्रतिष्ठापना करून दर दिवशी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून जनतेचे मनोरंजन केले. जगदंबा देवीची मूर्तीची विद्युत रोषणाईत सुशोभित केलेल्या रथातून गावातून मिरवणूक काढली. सनई, बँजो आदि वाद्यांच्या गजरात जगदंबा मातेच्या जयजयकार करीत विसर्जन करण्यात आले.