ब्राह्मणगाव विद्यालयात नाट्यमय शिवचरित्र व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 17:45 IST2019-02-15T17:44:56+5:302019-02-15T17:45:19+5:30
ब्राह्मणगाव : म.वि.प्र.समाज शिक्षण संस्था नाशिक संचलित श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल ब्राम्हणगांव विद्यालयात पुणे येथील प्रा.श्रीरंग बोराडे यांचे नाट्यमय शिवचरित्र व्याख्यान संपन्न झाले.

ब्राह्मणगाव विद्यालयात नाट्यमय शिवचरित्र व्याख्यान
ब्राह्मणगाव : म.वि.प्र.समाज शिक्षण संस्था नाशिक संचलित श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल ब्राम्हणगांव विद्यालयात पुणे येथील प्रा.श्रीरंग बोराडे यांचे नाट्यमय शिवचरित्र व्याख्यान संपन्न झाले.
मुख्याध्यापिका व्ही.बी. बच्छाव, पर्यवेक्षक एस.टी. भामरे यांच्या उपस्थितीत बोराडे यांनी शिवाजी महाराजांचा जन्म, बालपण, जिजाऊंनी शिवरायांचे केलेले संगोपन, त्यांच्यावर केलेले संस्कार तसेच महाराजांच्या कार्य कतृत्वाविषयी सविस्तर माहिती दिली. शिवरायांचे विचार सांगतांना त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, विचार बदला, जीवन बदलेल. सुत्रसंचलन एस.पी.जाधव यांनी केले.