शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रोगमुक्तीसाठी निसर्गोपचार पद्धती आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2022 23:06 IST

लोहोणेर : मानवाने पंच महाभूतांचे तत्त्व अंगीकारले असता मानवी जीवन सहज सोपे होते. निसर्ग नियमांचे पालन करीत फास्ट फूडचा अवलंब न करता निसर्ग निर्मित पूरक पोषक द्रव्ये सेवन केल्यास त्याचा फायदा शरीरासाठी नक्की होतो. कोणत्याही रोगास प्रतिकारक शक्तीच मारक ठरते. त्यासाठी सात्त्विक व शुद्ध आहार व व्यायामाची जोड महत्वाची आहे, असे प्रतिपादन नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केले.

ठळक मुद्देदीपक पांडे : लोहोणेर येथे कार्यक्रमात प्रतिपादन

लोहोणेर : मानवाने पंच महाभूतांचे तत्त्व अंगीकारले असता मानवी जीवन सहज सोपे होते. निसर्ग नियमांचे पालन करीत फास्ट फूडचा अवलंब न करता निसर्ग निर्मित पूरक पोषक द्रव्ये सेवन केल्यास त्याचा फायदा शरीरासाठी नक्की होतो. कोणत्याही रोगास प्रतिकारक शक्तीच मारक ठरते. त्यासाठी सात्त्विक व शुद्ध आहार व व्यायामाची जोड महत्वाची आहे, असे प्रतिपादन नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केले.ठेंगोडा येथे स्वयंभू सिद्धिविनायक मंदिराच्या आवारात आयोजित कार्यक्रमात पाण्डेय बोलत होते. पाण्डेय यांनी लोहोणेर व ठेंगोडा गावास सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार दिलीप बोरसे, गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त वसंत मोरे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, मविप्र संचालक डॉ. प्रशांत देवरे, सुदर्शन सोनवणे, पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार, यशवंत पाटील, दिलीप अहिरे, रामचंद्र जाधव, भुवलसिंग, संजय पांडे, संजय लोखंडे, राहुल देवरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पाण्डेय यांनी सांगितले, माणसाला सर्व रोगांपासून पूर्णपणे मुक्ती हवी असेल तर निसर्ग उपचार पद्धती अवलंबून तिच्या सान्निध्यात राहावे लागेल. आपले शरीर पंचमहाभूतांनी बनलेले असून पंचमहाभूतांचे मूळ सिद्धांत यापासून दूर गेल्यामुळे आजाराची लागण होते. जगभरात रक्तदाब, मधुमेह, थायरॉइड, संधिवात असे विविध आजार मनाने ग्रासलेल्या लोकांना असून यास बदललेली जीवनशैली कारणीभूत असल्याचेही त्यांनी सांगितले.डॉ.प्रशांत देवरे यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन निखिल रोकडे यांनी केले, तर आभार यशवंत पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला राजेंद्र अलई, सतीश देशमुख, नारायण निकम, दिलीप आहिरे, शांताराम वाघ, आनंदा लाडे, दीपक बच्छाव, शरद धनवटे, प्रसाद देशमुख, राकेश गुळेचा, तुळशीराम शिंदे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :PoliceपोलिसRural Developmentग्रामीण विकास