शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

नाशिकच्या अभियंता शाखेला सलग चौथ्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:29 IST

गेल्या वर्षभरात विविध उपक्रम राबवून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दी इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनियर्स (अभियंता शाखा) नाशिक शाखेला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट सेंटरचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सलग चौथ्या वर्षी पुरस्कार मिळवणारी नाशिक शाखा सर्वोत्कृष्ट ठरली आहे.

सातपूर : गेल्या वर्षभरात विविध उपक्रम राबवून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दी इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनियर्स (अभियंता शाखा) नाशिक शाखेला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट सेंटरचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सलग चौथ्या वर्षी पुरस्कार मिळवणारी नाशिक शाखा सर्वोत्कृष्ट ठरली आहे.इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनियर्स या संस्थेच्या संपूर्ण भारतात शाखा असून, शाखांच्या माध्यमातून शासकीय, निमशासकीय तसेच विविध क्षेत्रात काम करणाºया अभियंत्यांसाठी अनेक उपक्र म राबविले जातात. नाशिक सेंटरचे अध्यक्ष संतोष मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर विविध तांत्रिक उपक्र म, चर्चासत्रे, राष्ट्रीय स्तरावरील उपक्र म, तसेच बॅचलर आॅफ इंजिनिअरिंगशी समकक्ष असलेल्या एएमआयई परीक्षेचे आयोजन आणि मार्गदर्शन, ग्रीन बिल्डिंग, तसेच नाशिकचे सेंटर पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर करणारे सेंटर आहे. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पही उभारण्यात आला आहे. त्यांच्या या उपक्रमाची दखल घेण्यात येऊन त्यांना गौरविण्यात आले. रांची येथे आयोजित शानदार कार्यक्र मात खारगपूर आयआयटीचे पद्मश्री प्रा. एजॉयकुमार रॉय, रेल्वेबोर्डाचे सदस्य राजेश अग्रवाल, अभियंता शाखेचे राष्ट्रीय अध्यक्ष टी. एम. गुणराजा, शिशिरकुमार बॅनर्जी यांच्या हस्ते नाशिक सेंटरचे अध्यक्ष संतोष मुथा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.देशातील २९ राज्यांतील ८५ अभियंता शाखांच्या सेंटरमधून नाशिकच्या अभियंता शाखेची निवड करण्यात आली आहे. यापूर्वीच नाशिकच्या सेंटरला स्मार्ट सेंटर म्हणून गौरविण्यात करण्यात आले आहे. गेल्या ७ वर्षांत ६ वेळा तसेच सलग ४ वेळा नाशिकच्या सेंटरला देशातील सर्वोत्कृष्ट सेंटर म्हणून गौरविण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण