शासकीय योजनांसाठी राष्टÑवादीची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:36 IST2017-08-06T01:36:28+5:302017-08-06T01:36:38+5:30
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे अनुदान कायम ठेवणे, शासकीय योजना पूर्ववत सुरू ठेवण्याच्या मागण्यांसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या ओबीसी सेलने शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने केली.

शासकीय योजनांसाठी राष्टÑवादीची निदर्शने
नाशिक : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे अनुदान कायम ठेवणे, शासकीय योजना पूर्ववत सुरू ठेवण्याच्या मागण्यांसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या ओबीसी सेलने शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने केली.
सेलचे अध्यक्ष सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली, तसेच सरकार गोरगरिबांचा छळ करीत असल्याचा आरोपही केला. यावेळी जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, नोटाबंदी, जीएसटी, वाढती महागाई व बेरोजगारीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली असून, सामान्यांना जगणे मुश्कील झालेले असताना सरकारने ओबीसी, अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया शिष्यवृत्तीतूनही कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी लता वालझाडे, नंदा राऊत, प्रकाश माळोदे, अरविंद सोनवणे, प्रमोद कांबळे, श्यामसिंग परदेशी, नासिर पठाण, स्वप्नील दुसाने, आशा निकम, गणेश धोत्रे, दामोदर दौंड आदिंसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.