राष्टवादी महिला आघाडीची रुग्णालयाला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:15 AM2018-10-23T01:15:51+5:302018-10-23T01:16:08+5:30

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात महिला रुग्णांना मिळणाºया वाईट वागणुकीची दखल घेऊन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली.

 Nationalist Women's Front attacks the hospital | राष्टवादी महिला आघाडीची रुग्णालयाला धडक

राष्टवादी महिला आघाडीची रुग्णालयाला धडक

Next

नाशिक : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात महिला रुग्णांना मिळणाºया वाईट वागणुकीची दखल घेऊन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली.  स्वरूपा राजू वाघमारे नामक महिला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. परंतु तिच्याकडे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांनी दुर्लक्ष केल्याने तिची प्रसूती पलंगावरच झाली आणि तिने मृत बालकाला जन्म दिला. बाळाच्या मृत्यूमुळे दु:खात असलेल्या या महिलेला बाळंतपणानंतर पलंगावरील घाण साफ करायला भाग पाडले.
महिलेची प्रकृती नाजूक झाल्याने तिचा रक्तदाब वाढला व महिला जमिनीवर कोसळल्याने यात महिलेच्या जिवाचे बरे-वाईट झाल्यास जबाबदार कोण? अशी विचारणा नाशिक शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केली. जिल्हा रुग्णालयातील मदतनीस कर्मचारी मीरा चिखले हिच्यावर कडक कारवाई करून निलंबित करावे, अशी मागणी नाशिक शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
यावेळी सुषमा पगारे, समिना मेमन, शोभा साबळे, सलमा शेख, पुष्पा राठोड, मनीषा अहिरराव, आशा भंदुरे, शाकेरा शेख, रंजना गांगुर्डे, रजनी चौरसिया, सुजाता कोल्हे, रंजना चव्हाण आदी उपस्थित होत्या.

Web Title:  Nationalist Women's Front attacks the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.