राष्ट्रवादी महिलांचे रस्त्यावर चूल मांडून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST2021-02-05T05:39:47+5:302021-02-05T05:39:47+5:30
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला, मात्र त्यात देशातील कष्टकरी, कामगारवर्ग व सर्वसामान्य महिलांसाठी कसलीही भरीव तरतूद ...

राष्ट्रवादी महिलांचे रस्त्यावर चूल मांडून आंदोलन
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला, मात्र त्यात देशातील कष्टकरी, कामगारवर्ग व सर्वसामान्य महिलांसाठी कसलीही भरीव तरतूद करण्यात आली नाही. देशात उज्ज्वला गॅसच्या कनेक्शनची मर्यादा एक कोटी इतक्या संख्येइतकी वाढविण्याची घोषणा केली. त्याचवेळी अर्थसंकल्पात इंधन दरावर अधिभार लावण्याची घोषणा करून सर्वसामान्य जनतेवरच भार टाकल्याने त्याचा निषेध यावेळी करण्यात आला. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली भगूर येथे महिलांनी गॅसची शेगडी रस्त्यावर मांडून त्यावर प्रतिकात्मक स्वयंपाक करण्याचे आंदोलन केले. उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून सरकार गॅसचे कनेक्शन देते, मात्र त्याच गॅसचे दर आज मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवलेले असल्याने, सर्वसामान्य व मजूर लोकांना गॅसचे सिलेंडर परवडत नसल्याची टीका यावेळी करण्यात आली. या आंदोलनात सायरा शेख, गायत्री झांजर, संगीता उमाप आदी महिला सहभागी झाल्या होत्या.
(फोटो ०२ एनसीपी)