राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शिक्षण शुल्काबाबत आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST2021-06-05T04:11:57+5:302021-06-05T04:11:57+5:30
यासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन दिले आहे. ज्या सुविधा गेल्या वर्षभर वापरल्या नाहीत, त्या ...

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शिक्षण शुल्काबाबत आक्रमक
यासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन दिले आहे. ज्या सुविधा गेल्या वर्षभर वापरल्या नाहीत, त्या सुविधांचेदेखील शुल्क मागील वर्षी शिक्षण संस्थांनी वसूल केले. संकटाच्या काळामध्ये शिक्षणासारख्या पवित्र व्यवसायामध्ये संस्था नफेखोरीचे धोरण सोडायला तयार नाहीत. शिक्षण संस्थांच्या या आडमुठे धोरणाच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मैदानात उतरली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभर ‘एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक भूमिका घेणार असल्याचे तालुकाध्यक्ष सौरभ नाठे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, प्रमोद सांगळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सौरभ नाठे, मेघा दराडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
इन्फो
शुल्क निश्चिती प्रक्रिया राबवावी
ज्या सुविधा विद्यार्थी वापरत नसतानाही शिक्षण संस्था त्याचे शुल्क आकारत असतील तर अशा संस्थांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. शिक्षण शुल्क समितीने लवकरात लवकर राज्यातील सर्व शिक्षण संस्थांच्या शुल्कनिश्चितीची प्रक्रिया करून नवीन शुल्क घोषित करावे. तोपर्यंत कोणत्याही पालकांकडून शिक्षण संस्थांना शुल्क आकारण्याचा हक्क नाही, असा आदेश काढावा. केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज योजना लागू करण्याचे निर्देश द्यावेत. नर्सरी ते दहावीचे शिक्षण देणार्या शिक्षण संस्थांनी शैक्षणिक साहित्य शाळेतूनच घेण्याची सक्ती करू नये आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
फोटो : ०४ सिन्नर राष्ट्रवादी
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शिक्षण शुल्काबाबत तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन देताना प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, प्रमोद सांगळे, तालुकाध्यक्ष सौरभ नाठे, मेघा दराडे आदी.
===Photopath===
040621\04nsk_20_04062021_13.jpg
===Caption===
फोटो : ०४ सिन्नर राष्ट्रवादी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने शिक्षण शुल्काबाबत तहसीलदार राहूल कोताडे यांना निवेदन देताना प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, प्रमोद सांगळे, तालुकाध्यक्ष सौरभ नाठे, मेघा दराडे आदी