समस्यांसाठी राष्ट्रवादी ‘रस्त्यावर’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:09 IST2017-10-01T23:35:19+5:302017-10-02T00:09:00+5:30
शहरातून जाणाºया पुणे-इंदूर महामार्गावरील तसेच चांदवड- नांदगाव रस्त्यावरील समस्यांबाबत राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने मनमाड- मालेगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याबाबत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

समस्यांसाठी राष्ट्रवादी ‘रस्त्यावर’!
मनमाड : शहरातून जाणाºया पुणे-इंदूर महामार्गावरील तसेच चांदवड- नांदगाव रस्त्यावरील समस्यांबाबत राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने मनमाड- मालेगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याबाबत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
शहर राष्टÑवादी कॉँगे्रसच्या वतीने आमदार पंकज भुजबळ, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, शहर अध्यक्ष राजेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्टÑवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, शहर अध्यक्ष राजेंद्र पगारे, रईस फारुकी, पापा थॉमस, राजेंद्र जाधव, हबीब शेख, प्रकाश बोधक, नगरसेवक छोटू पाटील, अमजद पठाण, अपर्णा देशमुख, डॉ. शरद शिंदे, पिटर फेरो, विजू उबाळे, कैलास मोरे, दीपाली कोरडे, अनुराग निकम, दत्तात्रय थोरात, सोनू आव्हाड, सागर आव्हाड, रामभाऊ निकम व कार्यकर्ते उपस्थित होते.