त्र्यंबक नगराध्यक्ष व पतीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
By Admin | Updated: May 16, 2017 17:04 IST2017-05-16T17:04:26+5:302017-05-16T17:04:26+5:30
नगराध्यक्ष पद अपात्र ठरवा : भाजपा-राष्ट्रवादीची मागणी

त्र्यंबक नगराध्यक्ष व पतीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : रजेच्या कालावधीत पारूप विकास आराखड्यात बदल करण्याचे परस्पर ठराव घुसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांचे नगराध्यक्ष पद अपात्र ठरवावे, तसेच कामकाजात हस्तक्षेप करणारे त्यांचे पती दीपक लढ्ढा यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि.१६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवक व पदाधिऱ्यांनी आंदोलन केले.
नगरपालिकेतील गटनेते रवींद्र सोनवणे यांच्यासह नगरसेवक व बांधकाम सभापती रवींद्र गमे, रायुकाँचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, कैलास मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष विजय लढ्ढा यांचे पती दीपक लढ्ढा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला साडी नेसवून अनोखे आंदोलन करीत घोषणाबाजी केली.