शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

कॉँग्रेसच्या सभापतिपदासाठी राष्टवादीची प्रतिष्ठापणाला !

By श्याम बागुल | Updated: January 3, 2020 19:35 IST

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या ताब्यात येऊन अंगावरील गुलाल झटकत नाही तोच विषय समित्यांच्या वाटपावरून महाविकास आघाडीत खटके उडाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या सदस्यांना शहरातील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देशिवसेनेकडून अडवणूक : राष्टवादीत सभापतिपदासाठी आमदारांचे लॉबिंग राष्टवादीने वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा देऊन हॉटेल सोडले.

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पदरात पडल्यानंतर अवघ्या काही तासांतच शिवसेनेने भूमिका बदलत कॉँग्रेसला विषय समित्यांचे सभापतिपद देण्यास नकार देतानाच राष्टवादीची एका सभापतिपदावर बोळवण करण्यास निघालेल्या सेनेला अखेरच्या क्षणी राष्टवादीच्या नेत्यांनी चांगलाच झटका दिला. महाविकास आघाडीत कॉँग्रेसपक्ष सहभागी असल्याने या पक्षाला सभापतिपद न दिल्यास भाजपबरोबर जाण्याची राष्टवादीने तयारी करताच, शिवसेनेला नमते घ्यावे लागले व कॉँग्रेसच्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादीला प्रतिष्ठापणाला लावावी लागली.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या ताब्यात येऊन अंगावरील गुलाल झटकत नाही तोच विषय समित्यांच्या वाटपावरून महाविकास आघाडीत खटके उडाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या सदस्यांना शहरातील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. या ठिकाणी रात्री सेना, राष्टवादी व कॉँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सेनेकडून भाऊसाहेब चौधरी, विजय करंजकर, आमदार सुहास कांदे आदी पदाधिकारी होते, तर राष्टवादीकडून माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, कोंडाजी मामा आव्हाड, रवींद्र पगार आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेने आपली सदस्यसंख्या अधिक असल्याने राष्टवादीला एकच सभापतिपद दिले जाईल असे सांगून शिवसेनेचे २५ सदस्य व अपक्ष, माकपाच्या सदस्यांचाही आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला. सदस्य संख्येचा विचार करून राष्टवादीचे १८ सदस्य असल्याने फक्त एक सभापतिपद देण्याची तयारी शिवसेनेने केली, तर कॉँग्रेस पक्षाचे दोन सदस्यदेखील सेनेच्या बाजूचे असल्याने कॉँगे्रसला सभापतिपद देण्यास त्यांनी थेट नकार दिला. राष्टÑवादीच्या नेत्यांनी या संदर्भात सेनेशी तडजोड करण्याची तयारी दर्शवित सेनेला अध्यक्षपदासारखे महत्त्वाचे पद दिल्याने उर्वरित चारही समित्या राष्ट्रवादी व काँग्रेसला देण्यात यावे असा आग्रह धरला. कॉँग्रेस महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याने एक सभापतिपद द्यावेच लागेल, असा आग्रह राष्टवादीने धरला व तसे न झाल्यास वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा देऊन हॉटेल सोडले.दरम्यान, शुक्रवारी सकाळी समीर भुजबळ यांनी हॉटेलमध्ये थांबलेल्या राष्टवादी व कॉँग्रेसच्या सदस्यांना भुजबळ फॉर्मवर बोलावणे धाडून थेट भाजपशी संपर्क साधला. राष्ट्रवादी, कॉँग्रेस व भाजपच्या संख्याबळाच्या आधारे सर्व समित्या ताब्यात घेण्याचे डावपेच सुरू झाले. याची माहिती सेनेला मिळताच, संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, आमदार नरेंद्र दराडे, सुहास कांदे आदींनी तत्काळ भुजबळ फॉर्म गाठून राष्टवादी व कॉँग्रेसची मनधरणी करीत, दोन विषय समित्यांचे सभापतिपद देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीचा गाडा पुढे सरकलाचौकट===

आमदारांचे लॉबिंगविषय समित्यांच्या सभापतिपदासाठी महाविकास आघाडीतच रस्सीखेच सुरू असताना राष्टवादी कॉँग्रेसमध्ये मात्र विद्यमान आमदारांनी आपापल्या समर्थकांसाठी जोरदार लॉबिंग केले. आमदार दिलीप बनकर यांनी विषय समितीच्या सभापतिपदासाठी संजय बनकर यांच्या नावाला विरोध दर्शवून त्याऐवजी निफाडचे सिद्धार्थ वनारसे यांचे नाव पुढे केले तर सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी कन्या सीमंतिनी कोकाटे यांच्यासाठी आग्रह धरला. मुळात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद निफाड तालुक्याला दिलेले असताना पुन्हा त्याच तालुक्यात सभापतिपद देणे योग्य होणार नसल्याची भूमिका समीर भुजबळ यांनी मांडली, तर सीमंतिनी कोकाटे या भाजपच्या सदस्य असून, त्यांना राष्टवादीकडून सभापतिपदाचे उमेदवार ठरविणे तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे पटवून देण्यात आले. त्यामुळे लॉबिंग करणाऱ्या दोन्ही आमदारांनी नाराज होऊन काढता पाय घेतला.

टॅग्स :Politicsराजकारणnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNCPराष्ट्रवादी काँग्रेसSameer Bhujbalसमीर भुजबळcongressकाँग्रेस