शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राष्टवादी काँग्रेसच्या वतीने  दोन तास ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:14 IST

तालुक्यातील वीज, पाणी व रस्त्यांसह इतर कामांची सोडवणूक व्हावी या मागणीसाठी राष्टवादी काँग्रेसच्या वतीने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पायरीवर दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

कळवण : तालुक्यातील वीज, पाणी व रस्त्यांसह इतर कामांची सोडवणूक व्हावी या मागणीसाठी राष्टवादी काँग्रेसच्या वतीने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पायरीवर दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था ढासळली असून, वीज पुरवठा सुरळीत करा, कनाशी-हतगड रस्त्यासह रस्त्यांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करा, सुळे उजवा व डाव्या कालव्याला व चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडावे या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, ज्येष्ठ नेते रवींद्र देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पंचायत समिती सभापती आशा पवार, उपसभापती विजय शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले. प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देऊन दोन तासानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. कळवण तालुक्यातील विजेचा खेळखंडोबा व निर्माण झालेल्या समस्यांसंदर्भात मुख्य अभियंता कुमठेकर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता टेंभुर्णे यांनी दिले तर सुळे उजव्या व डाव्या कालव्याला तसेच चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करून आदेशान्वये पाणी सोडण्याचे आश्वासन अभियंता मुसळे व चौधरी यांनी दिले. कनाशी ते हतगड रस्त्यासंदर्भात शासनस्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आला असून, तालुक्यातील रस्ते दुरुस्तीबाबत प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन सहाय्यक अभियंता आदित्य भोसले यांनी दिल्यानंतर आंदोलकन मागे घेण्यात आले. पाणी असून विजेअभावी शेतपिकांना पाणी देता येत नाही. वीज ग्राहक वीजबिल भरणा नियमित करीत असूनसुद्धा वीज नियोजित वेळेनुसार नियमित मिळत नाही. अवघे दोन तासपण अनियमित वीजपुरवठा मिळतो. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे नुकसान होत आहे. मुख्य अभियंता कुमठेकर यांच्याकडे बैठकीत प्रश्न मार्गी लागले नाहीतर तर आंदोलन करावे लागेल.  - जयश्री पवार, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषदशेतीला लागणारे पाणी हे विजेवर अवलंबून आहे. त्यामुळे वीजपुरवठा वेळेवर मिळत नसल्याने सातत्याने होणारे भारनियमन व विजेच्या खेळखंडोबामुळे शेतपिकांचे नुकसान होत असल्याने शेती व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. वीज ठरवून दिलेल्या निर्धारित वेळेत न मिळता केव्हाही येते आणि केव्हाही जाते.  - रमेश पवार, सरपंच, दळवट

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNashikनाशिक