शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑवादी कॉँग्रेसपुढे दिंडोरीचे त्रांगडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 01:42 IST

जागा वाटपात राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वाट्याला असलेल्या दिंडोरी मतदारसंघातून डॉ. भारती पवार की धनराज महाले या दोघांच्या नावावर पक्षात एकमत होत नसताना त्यातच मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने या जागेवर दावा सांगितल्यामुळे राष्टÑवादीपुढे त्रांगडे उभे राहिले आहे. अशातच भारती पवार यांना उमेदवारी नाकारल्यास त्यांच्याकडून वेगळा विचार होण्याची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे विजयाची शक्यता बाळगून असलेली राष्ट्रवादी कॉँग्रेस पेचात सापडली आहे.

ठळक मुद्देएकमत नाही : उमेदवार ठरेना, जागेचा प्रश्न सुटेना

नाशिक : जागा वाटपात राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वाट्याला असलेल्या दिंडोरी मतदारसंघातून डॉ. भारती पवार की धनराज महाले या दोघांच्या नावावर पक्षात एकमत होत नसताना त्यातच मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने या जागेवर दावा सांगितल्यामुळे राष्टÑवादीपुढे त्रांगडे उभे राहिले आहे. अशातच भारती पवार यांना उमेदवारी नाकारल्यास त्यांच्याकडून वेगळा विचार होण्याची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे विजयाची शक्यता बाळगून असलेली राष्ट्रवादी कॉँग्रेस पेचात सापडली आहे.सध्या भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण या मतदारसंघाचे गेल्या तीन टर्मपासून प्रतिनिधित्व करीत आहेत. गेल्या निवडणुकीत मोदी लाटेतही डॉ. भारती पवार यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसकडून त्यांना कडवी लढत दिली होती. त्यामुळे त्याचवेळी उमेदवारी करतील अशी अटकळ पक्षाचे कार्यकर्ते व खुद्द भारती पवारदेखील बाळगून होत्या. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्टÑवादीची ताकद वाढण्यास मदत झाली, परंतु उमेदवारीचा मोठा पेच निर्माण झाला. भाजपा-सेनेची युती होणार हे गृहीत धरून महाले यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये उमेदवारीच्या उद्देशाने प्रवेश केला आहे. त्यांचे वडील स्व. हरिभाऊ महाले यांनी जनता दलाकडून आताच्या दिंडोरी व पूर्वीच्या मालेगाव नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले असल्याने त्यांच्या पुण्याईने निवडणूक सोपी जाण्याची महाले यांची योजना असली तरी, राष्टÑवादी कॉँग्रेस अद्यापही उमेदवार निश्चित करू शकलेली नाही. विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याविषयी मतदारांची असलेली नकारात्मकता पक्षाने सर्व्हे करून जाणून घेतल्यामुळे त्यांनाच भाजपाकडून उमेदवारी दिली जाईल याची शाश्वती नसली तरी, भाजपा अन्य सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. अशा वेळी भारती पवार यांना भाजपाकडून गळाला लावण्याचा प्रयत्न नाकारता येणार नाही.उमेदवारीबाबत सावध पावलेराष्टÑवादी कॉँग्रेसदेखील उमेदवार जाहीर करण्याबाबत सावध पावले टाकत असताना मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने दिंडोरीच्या जागेवर दावा सांगून राष्टÑवादीपुढे पेच निर्माण केला आहे. सुरगाणा-कळवण मतदारसंघाचे आमदार जिवा पांडू गावित हे पक्षाचे उमेदवार असतील असे पक्षाने जाहीरही करून टाकले आहे. त्यामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसला एकीकडे स्वपक्षातील पेच मिटविण्याबरोबरच, माकपाची समजूत काढण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस