देवळ्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसची बैठक
By Admin | Updated: January 21, 2017 23:16 IST2017-01-21T23:16:05+5:302017-01-21T23:16:28+5:30
देवळ्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसची बैठक

देवळ्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसची बैठक
देवळा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद दूर ठेवून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या पाठीशी आपली ताकद उभी करावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निवडणूक समितीचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले. देवळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत ते बोलत होते.
देवळा येथे आयोजित करण्यात आलेल्या रा.काँ.च्या बैठकीस माजी आमदार शांतारामतात्या अहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती उषा बच्छाव, जि. प. सदस्य भारती पवार, मविप्र संचालक डॉ. विश्राम निकम, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निवृत्ती कापसे, योगेश अहेर, जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार, उमराणा बाजार समितीचे सभापती विलास देवरे, सुनील अहेर, दीपक वाघ, डॉ. संजय निकम, विजय पवार, अतुल अहेर आदि मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडित निकम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अॅड. पगार यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छोट्या मोठ्या कुरबुरींनी संभ्रमित न होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले. प्रा. सतीश ठाकरे यांनी आभार मानले. (वार्ताहर)