येवला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:14 IST2021-09-27T04:14:58+5:302021-09-27T04:14:58+5:30

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यान प्रसंगी प्रमुख अतिथी ...

National Service Plan Day at Yeola College | येवला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन

येवला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यान प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून निमगाव येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.ज्ञानेश्वर सोनवणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.भाऊसाहेब गमे हे होते. प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना येवला तालुका समन्वयक प्रा.अक्षय बळे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.गमे यांनी, महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कोरोना काळात केलेल्या जनजागृती व इतर मदत कार्याचा आढावा घेतला. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.रघुनाथ वाकळे यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय डॉ.मनीषा गायकवाड यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.डी.के. कन्नोर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.नाना घुगे यांनी केले.

Web Title: National Service Plan Day at Yeola College