राष्ट्रीय लोकअदालतीत २८ लाखांचा दंड वसूल
By Admin | Updated: October 16, 2015 21:43 IST2015-10-16T21:41:27+5:302015-10-16T21:43:29+5:30
राष्ट्रीय लोकअदालतीत २८ लाखांचा दंड वसूल

राष्ट्रीय लोकअदालतीत २८ लाखांचा दंड वसूल
नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत धनादेश न वटणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन, किरकोळ गुन्ह्यांपोटी सुमारे २८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर ९५४ प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहिती जिल्हा व विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही़ आऱ अगरवाल यांनी दिली आहे़
जिल्हा न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते़ त्यात दावा दाखल पूर्व, फौजदारी, वाहतूक नियमांचे उल्लंघन, किरकोळ स्वरूपाचे गुन्हे तसेच महानगरपालिका अशी एकूण तीन हजार ७४५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. या लोकअदालतीत एक हजार ३४० दावा दाखल पूर्व प्रकरणांपैकी १३ प्रकरणे निकाली काढण्यात आली़ तसेच धनादेश न वटल्याच्या ९०३ फौजदारी प्रकरणांपैकी ३७२ प्रकरणांचा निपटारा करून २६ लाख ३५ हजार ८२३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़
वाहतुकी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १ हजार ४४९ प्रकरणांपैकी ५७२ प्रकरणे निकाली काढून १ लाख ३२ हजार ३५० रु पयांचा दंड वसूल करण्यात आला, तर किरकोळ स्वरूपाच्या ११ प्रकरणांपैकी ७ प्रकरणे निकाली काढून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़ महापालिकेशी संबंधित ४२ प्रकरणी ठेवण्यात आली होती. त्यात तीन प्रकरणी निकाली काढण्यात आली़ (प्रतिनिधी)