नाशिकमध्ये पुढिल महिन्यात राष्ट्रीय लोकअदालत : सूर्यकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 23:43 IST2017-08-08T22:45:17+5:302017-08-08T23:43:37+5:30

 National Lok Adalat in Nashik next month: Suryakant Shinde | नाशिकमध्ये पुढिल महिन्यात राष्ट्रीय लोकअदालत : सूर्यकांत शिंदे

नाशिकमध्ये पुढिल महिन्यात राष्ट्रीय लोकअदालत : सूर्यकांत शिंदे

ठळक मुद्दे ९ सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजनपक्षकारांना सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक :
न्यायालयीन दाव्यांमुळे दुरावलेले नातेसंबंध, वेळेचा व पैशांचा होणारा अपव्यय लक्षात घेता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत आयोजित करण्यात येणाºया राष्ट्रीय लोकअदालती या पक्षकारांसाठी वरदान ठरत आहेत़ गत दोन वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्यातील सुमारे पाच हजार दावे निकाली काढण्यात आले असून, येत्या ९ सप्टेंबरला पुन्हा राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे़ या लोकअदालतीमध्ये जास्तीत पक्षकारांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी केले आहे़
राष्ट्रीय लोकअदालतीची माहिती देण्यासाठी मंगळवारी (दि़८) शिंदे यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते़ त्यावेळी शिंदे यांनी सांगितले की, ‘भांडणापेक्षा समझोता बरा, मिळेल त्यातच आनंद खरा’ हे ब्रीद समोर ठेवून लोकअदालतींमध्ये काम केले जाते़ न्यायालयातील प्रलंबित खटल्याची वाढती संख्या, न्यायाधीशांची कमी संख्या यामुळे न्यायदानास विलंब होतो़ जिल्ह्यात आजमितीस १ लाख ५४ हजार केसेस प्रलंबित असून ही संख्या कमी करण्यासाठी तसेच जलद न्यायासाठी लोकअदालत हे प्रभावी माध्यम आहे़
न्यायासाठी पक्षकारांना न्यायालयाचे खेटे मारावे लागतात त्यामुळे आजोबांनी दाखल केलेला दावा नातवापर्यंत चालू असतो, असे गमतीने म्हटले जाते़ न्यायालयातील हे प्रलंबित खटले निकाली निघावेत तसेच पक्षकारांना जलद न्याय मिळावा, त्यांच्यातील आपसी संबंध टिकून राहावेत यासाठी लोकअदालत सुरू झाली़ या लोकअदालतीमध्ये दावा दाखलपूर्व व दावा दाखल दिवाणी स्वरूपाचे तसेच भारतीय दंड विधानातील तडतोडीचे खटले दाखल करता येतात़

Web Title:  National Lok Adalat in Nashik next month: Suryakant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.