नाशकात आजपासून राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा

By Admin | Updated: February 25, 2015 00:44 IST2015-02-25T00:44:21+5:302015-02-25T00:44:49+5:30

नाशकात आजपासून राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा

National fencing competition from Nashik today | नाशकात आजपासून राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा

नाशकात आजपासून राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा

  नाशिक : नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन यांच्या विद्यमाने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात होणाऱ्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारी (दि.२५) या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये वरिष्ठ गटाच्या पुरुष आणि महिलांच्या गटात या स्पर्धा होणार आहेत. सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार आहे. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्टेडिअममध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची सहा क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत. सर्व स्पर्धांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आॅपरेटरचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंनी मिळवलेले गुण लगेचच प्रेक्षकांना समजणार आहेत. दरम्यान, या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोेषणा संघटनेचे महाराष्ट्राचे सचिव डॉ. उदय डोंगरे यांनी केली आहे. संघ पुढीलप्रमाणे- पुरुष संघ- अजिंक्य दुधारे, दिग्विजय सोनवणे, जय शर्मा, अक्षय देशमुख (सर्व नाशिक) स्वप्नील जांगड, सूरज पाटील, सागर मगरे (औरंगाबाद ), नितीन कोळी (कोल्हापूर), गणेश महंगाडे (सातारा), यल थोंबा (पुणे), रंजीतसिंह (बुलढाणा), दीपक सरदारसिंग (हिंगोली), मार्गदर्शक राजू शिंदे (नाशिक), व्यवस्थापक प्रकाश काटोळे (सोलापूर) महिला- शरयू पाटील, अस्मिता दुधारे, रोशनी मुर्तडक, स्नेहल विधाते (सर्व नाशिक), ज्योती सुतार (कोल्हापूर), दामिनी रंभाड (नागपूर), कोमल शिंदे, जयश्री सोळंके (औरंगाबाद), निशा पुजारी (हिंगोली), उर्वशी मानकर (मुंबई उपनगर), मार्गदर्शक- ललित गांधी, व्यवस्थापक नितीन हिंगमिरे

Web Title: National fencing competition from Nashik today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.