राष्ट्रीय मधुमेह परिषदेस प्रारंभ

By Admin | Updated: June 8, 2014 00:40 IST2014-06-07T23:00:25+5:302014-06-08T00:40:23+5:30

मधुमेह संशोधन केंद्रासाठी सहकार्य : जामकर

National Diabetes Council Start | राष्ट्रीय मधुमेह परिषदेस प्रारंभ

राष्ट्रीय मधुमेह परिषदेस प्रारंभ

 नाशिक : मधुमेहाची मोठी समस्या जगभरात निर्माण झाली आहे़ यामध्ये भारतात याचे प्रमाण खूप मोठे असून, यावरील औषधोपचार सर्वसामान्य नागरिकांनाही स्वस्तात उपलब्ध व्हावेत़, यासाठी मधुमेह संशोधन केंद्रासाठी मुंबईत जागा तसेच इतर उभारणी करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ अरुण जामकर यांनी येथे व्यक्त केले़

असोसिएशन आॅफ फिजीशियन्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या राज्यस्तरीय मधुमेह परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ डॉ़ जामकर व उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले़
डॉ़ जामकर म्हणाले, मधुमेह निवारण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठही प्रयत्न करत आहे़ रुग्णांसाठी औषधोपचार उपलब्ध करणे हा एक भाग असला तरी मधुमेह होऊ नये म्हणून सर्वसामान्यांची जनजागृती करण्यासाठी विद्यापीठ भर देणार आहे़ आरोग्य विज्ञान विद्यापीठात मधुमेह आजारासाठी दोन अभ्यासक्रम सुरू आहेत़ अधिक सखोल नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचीही विद्यापीठाची तयारी असून, यासाठी तज्ज्ञांनी पुढे येण्याची गरज आहे़ ग्रामीण भागातील रुग्णांना मधुमेहाच्या औषधांचा लाभ व्हावा, माहिती व्हावी यासाठी अशा परिषदा प्रत्येक जिल्हानिहाय होणे गरजेचे आहे़
डॉ़ शशांक जोशी म्हणाले, नाशिक जशी धार्मिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे तशी ती भारताची वैद्यकीय शिक्षणाची राजधानी व्हावी व यासाठी आरोग्य विद्यापीठाने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली़
याप्रसंगी असोसिएशन आॅफ फिजीशियन्सचे अध्यक्ष डॉ़ संजीव इंदूरकर, डॉ़ विजय पणीकर, डॉ़ समर बॅनर्जी, डॉ़ मृणाली केळकर, डॉ़ राहुल पाटील व्यासपीठावर उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: National Diabetes Council Start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.