राष्ट्रीय क्र ीडा विद्यापीठाच्या मागणीसाठी सह्यांची मोहीम
By Admin | Updated: August 26, 2016 22:08 IST2016-08-26T22:07:22+5:302016-08-26T22:08:24+5:30
राष्ट्रीय क्र ीडा विद्यापीठाच्या मागणीसाठी सह्यांची मोहीम

राष्ट्रीय क्र ीडा विद्यापीठाच्या मागणीसाठी सह्यांची मोहीम
येवला : अध्यापक भारतीच्या उपक्रमात क्र ीडापटूंसह संघटना, प्रशिक्षकांचा सहभाग येवला : अध्यापक भारतीच्या ‘क्र ीडा शिक्षण हक्क अभियान’अंतर्गत सोमवारी (दि. २९) राष्ट्रीय क्रीडादिनी राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ व क्रीडा विद्यालय स्थापनेच्या मागणीसाठी नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अध्यापक
भारतीतर्फे सह्यांची मोहीम राबविण्यात आली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडापटू, क्र ीडा मंडळे व संघटना, क्रीडाशिक्षक-प्रशिक्षक क्रीडाप्रेमींना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विविध खेळ व क्रीडा प्रकार मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून, खेळाद्वारे राष्ट्रीय अस्मिता व देशाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आणि जिल्हा व तालुकास्तरावर क्रीडा विद्यालय स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी अध्यापक भारतीकडून व्यापकस्वरूपात सह्याचे अभियान राबविण्यात येत आहे. या मागणीस अधिक गती देऊन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय क्रीडादिनी (दि.२९) सकाळी १० वा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सह्यांची मोहीम राबविण्यात येणार असून, जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय/ राज्य क्रीडा विद्यापीठाची स्थापना व क्रीडा विद्यालयासाठी जनजागृती करण्यासाठी अध्यापक भारतीच्या वतीने राष्ट्रीय क्रीडादिनी क्र ीडा शिक्षण हक्क अभियानअंतर्गत सह्याची मोहीम राबविली जाणार आहे. मोहिमेत नाशिक शहर व जिल्ह्यातीलक्र ीडा मंडळे, क्रीडा संस्था, संघटना, व्यक्ती, खेळाडू, क्र ीडाप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन शरद शेजवळ व समाधान पगारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
क्रीडा शिक्षण हक्क अभियानातील ठळक मागण्या पुढीलप्रमाणे- केंद्र सरकारने राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ व राज्य सरकारने राज्य क्र ीडा विद्यापीठ स्थापन करावे व नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर तालुका व जिल्हा स्तरावर निवासी क्रीडा विद्यालये व महाविद्यालये स्थापन करावीत.
अभियानाच्या यशस्वीतेसाठी विनोद पानसरे, अजय जाधव, अमिन शेख, गौतम हिरे, अखिल गांगुर्डे, मयूर सोनवणे, प्रियंका केवट, खालील सय्यद, अभय लोखंडे, प्रवीण कर्डक, सागर पगारे, देवशिंग खरे, प्रबुद्ध थोरात, सचिन बागुल, सुनील वाघ, विशाल बर्वे, ईश्वर गांगुर्डे, स्वप्नील गाढे-पाटील,पिंकू बागुल, सुनील मोंडे, संदीप चक्रनारायण प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)