राष्ट्रीय दुखवट्यामुळे महासभा तहकूब
By Admin | Updated: May 18, 2017 18:09 IST2017-05-18T18:09:04+5:302017-05-18T18:09:04+5:30
महापालिका : दवे, ए. टी. पवार यांना श्रद्धांजली

राष्ट्रीय दुखवट्यामुळे महासभा तहकूब
नाशिक : केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अनिल दवे यांच्या निधनामुळे दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्याने गुरुवारी (दि.१८) महापालिकेची महासभा तहकूब करण्यात आली. याचवेळी माजी मंत्री ए. टी. पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मनसेच्या सत्ताकाळात महासभा तहकुबीसंबंधीचा ठराव करण्यात आलेला होता. या ठरावानुसार, महापालिकेच्या विद्यमान सदस्याचे निधन झाल्यास आणि राष्ट्रीय दुखवटा जाहीर झालेला असल्यास महासभा तहकूब करण्यात येईल. इतरवेळी दिवंगतांना श्रद्धांजली वाहून सभेचे कामकाज पुढे चालविले जाईल. गुरुवारी बोलाविण्यात आलेली महासभा ही दिवंगतांना श्रद्धांजली वाहून अर्ध्या तासासाठी तहकूब केली जाणार होती परंतु, महासभेपूर्वीच केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अनिल दवे यांच्या निधनाची वार्ता आली आणि दोन दिवसांच्या राष्ट्रीय दुखवट्यामुळे महापौर रंजना भानसी यांनी महासभा तहकूब केली.