रोटरी क्लब कळवण कडून शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 15:32 IST2018-09-12T15:31:50+5:302018-09-12T15:32:16+5:30
कळवण- कळवण येथील रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्यावतीने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत उत्कृष्ट काम करणाऱ्या २० शिक्षकांचा सन्मान सार्वजनिक वाचनालयाचा सभागृहात करण्यात आला.

रोटरी क्लब कळवण कडून शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड
कळवण-
कळवण येथील रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्यावतीने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत उत्कृष्ट काम करणाऱ्या २० शिक्षकांचा सन्मान सार्वजनिक वाचनालयाचा सभागृहात करण्यात आला.
या कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे प्रांतपाल राजीव शर्मा, इनरव्हिल क्लबच्या राष्ट्रीय समन्वयक रश्मी शर्मा, रोटरी जिल्हा सेक्र ेटरी आशा वेणूगोपाल, मुरलीधर बाबा अमृतकार ,तहसीलदार कैलास चावडे, उपनगराध्यक्ष कौतिक पगार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कळवण तालुक्यातील सीताराम गावित (उंबरदे) सुरेश दळवी( भांडणे) मीना पवार (सुळे पाडा) श्रीमती चंद्रकला कुंदे (चणकापूर) संजय जाधव (दह्याणे) लता बिहरम (पाळे पिंपरी) कैलास पवार (बापखेडा) संजय देशमुख (रामनगर) चंद्रकांत खिरोळकर (बंगाल पाडा) विश्वनाथ गावित (जामले) पुरु षोत्तम सोनवणे ( वडपाडा) कैलास चव्हाण (सरले दिगर) सुनील खैरनार (वाडी बुद्रुक) श्रीमती धनश्री जाधव (बेटकी पाडा) दिपाली पगार (नाकोडे ) सरला अिहरराव (पाटविहीर) अभय कजगावकर (कळवण) एन. बी. पवार( कळवण) प्रतिभा पवार(कळवण ) मनिषा भामरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी पुरस्कार्थी शिक्षकांच्यावतीने सुनील खैरणार , सरला आहिराव , दीपाली पगार ,सौ चंद्रकला कुंदे यांनी मनोगत व्यक्त केले. े प्रास्ताविक विलास शिरोरे यांनी केले. सूत्रसंचालन जितेंद्र कापडणे यांनी केले तर आभार रोटरीचे सेक्र ेटरी रवींद्र पगार यांनी मानले.कार्यक्र म यशस्वीतेसाठी रोटरीचे अध्यक्ष निंबा पगार, इनरव्हीलच्या अध्यक्षा महानंदा अमृतकार, स्वप्नील शिरोरे ,गंगाधर गुंजाळ , एस बी सोनवणे, गालिब मिर्झा, बापू कुमावत, संजय बगे, यांनी परिश्रम घेतले.
-