नाशिककरांची सायकल चळवळ प्रेरणादायी

By Admin | Updated: March 26, 2015 00:14 IST2015-03-26T00:14:27+5:302015-03-26T00:14:44+5:30

अभिषेक बच्चन : नाशिक सायकलिस्टच्या ‘पॅलॅटोन-२०१५’चे बक्षीस वितरण

Nasikkar's cycle movement is inspirational | नाशिककरांची सायकल चळवळ प्रेरणादायी

नाशिककरांची सायकल चळवळ प्रेरणादायी

नाशिक : सायकल हे एकमेव असे वाहन आहे जे पर्यावरणपूरक आहे. निसर्गासह नागरिकांचेही आरोग्य सुदृढ ठेवण्यामध्ये सायकलची महत्त्वाची भूमिका असून, नाशिककरांनी हे समजून घेत विकसित केलेली सायकल चळवळ नक्कीच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अभिनेता अभिषेक बच्चन यांनी केले.
नाशिक सायकलिस्ट फाउण्डेशनच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या ‘पॅलॅटोन-२०१५’ सायकल स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा शहरातील आसारामबापू पुलाजवळ पार पडला. यावेळी बच्चन प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी अभिषेक यांनी नाशिककरांचे सायकलविषयी असलेले प्रेम व उत्साह वाखाणण्याजोगा असल्याचे सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी व मानवाच्या सुदृढ आरोग्यासाठी सायकलचा छंद प्रत्येकाने जोपासावा असा संदेश नाशिककरांच्या सायकल चळवळीने दिला आहे. नाशिक सायकलिस्टकडून आज्ञा झाली तर मुंबईहून नाशिकला सायकलवर नक्कीच येण्याचा प्रयत्न करू. चित्रपटनगरीमध्येदेखील मी सायकल चालविण्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करील. यावेळी व्यासपीठावर फाउण्डेशनचे अध्यक्ष विशाल उगले, सायकलपटू तथा महाराष्ट्र पोलीस अकादमीचे सहसंचालक हरीश बैजल, सचिव डॉ. मनीषा रौंदळ, अनंत राजेगावकर, श्रीकांत बडवे, प्रवीण पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत अठरा ते पन्नास वर्षे वयोगटात १५० किलोमीटर सायकल चालवित प्रथम क्रमांकाचे विजेते ठरलेले अहमदनगरचे सायकलपटू रवि करांदे, प्रदीप कुंडू, रमेश जोशी यांना ३१ हजारांचा धनादेश, प्रमाणपत्र व आधुनिक सायकल बक्षीस म्हणून अभिषेकच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. तसेच द्वितीय क्रमांकही अहमदनगरच्या सायकलपटूनींच राखण्यात यश मिळविले. के. आशिष, जितु सिन्हा, अमीत शर्मा या सायकलपटूंना द्वितीय पारितोषिक २१ हजार रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र, सायकल बक्षीस म्हणून देण्यात आली. तृतीय क्रमांक नाशिकच्या सायकलपटूंनी मिळविला. यामध्ये डॉ. महेंद्र महाजन, डॉ. हितेंद्र महाजन, अरुण भोये यांना अकरा हजार रुपयांचे पारितोषिक अभिषेक यांच्या हस्ते देण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Nasikkar's cycle movement is inspirational

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.