‘पाणी वाचवा’ संदेश देण्यासाठी धावले नाशिककर

By Admin | Updated: July 14, 2014 00:28 IST2014-07-13T23:45:41+5:302014-07-14T00:28:44+5:30

‘पाणी वाचवा’ संदेश देण्यासाठी धावले नाशिककर

Nasikkar ran for message to save the water | ‘पाणी वाचवा’ संदेश देण्यासाठी धावले नाशिककर

‘पाणी वाचवा’ संदेश देण्यासाठी धावले नाशिककर

नाशिक : पावसाने ओढ दिल्याने सर्वत्र पाणीटंचाईचे भीषण संकट उभे ठाकले आहे. नाशिक महापालिकेनेही पाणीकपात सुरू केली आहे. या संकटावर मात करण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करा आणि पाणीबचत करा, असा संदेश देण्याकरिता रविवारी सेव्ह वॉटर रनचे आयोजन करण्यात आले होते.
वर्ल्ड आॅफ स्पोटर््स शिक्षण सांस्कृतिक संस्था आणि डेकॅथलॉन यांच्या संयुक्त विद्यमाने या सेव्ह वॉटर रनचे आयोजन करण्यात आले होते. गोल्फ क्लब सिग्नलपासून सकाळी साडेसात वाजता या रनला प्रारंभ झाला. क्रेडाईचे माजी अध्यक्ष व निसर्गप्रेमी किरण चव्हाण, नंदू देसाई यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रनचा आरंभ करण्यात आला. टिळकवाडी मार्गे वावरे चौक, सीबीएस, त्र्यंबक नाका मार्ग गोल्फ क्लब येथे रनचा समारोप करण्यात आला. रनच्या माध्यमातून लोकांना पाणीबचतीचा संदेश देण्यात आला. या रनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंना डेकॅथलॉनच्या वतीने प्रत्येकी शंभर रुपयांचे डिस्काऊंट कूपन देण्यात आले. तसेच सहभागीमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. विजेत्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. सागर बोंडे, भगवान काळे, चंद्रकांत पाटील, श्रेयस त्रिवेदी, हरी सोनकांबळे, प्रकाश ढगे यांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले. रनमध्ये संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळते, भाऊसाहेब पाटील, संजय शिंदे, अनिल उगले, कुणाल धनवंत, कुणाल कानडे, निखिल कुलकर्णी, निनाद व आशिष निंबाळते, सचिन कोरडे, शुभम केदार, अभिजित चव्हाणके आदिंसह नाशिककर सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Nasikkar ran for message to save the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.