शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नाशिकमध्ये प्रणयकाळातील सर्पांची झुंज बघून व्हाल थक्क!

By azhar.sheikh | Updated: March 28, 2018 16:08 IST

नाशिक : सध्या उन्हाळा तापला असून हा काळ सर्पांच्या विविध प्रजातींचा प्रणयाचा मानला जातो. सर्प हा असा एकमेव सरपटणारा प्राणी आहे, की त्याला कुठल्याही प्रकारचा आवाज नसतो. त्यामुळे प्रणयाची इच्छा पुर्ण करण्यासाठी मादी नैसर्गिकरित्या एकप्रकारचा गंध वास्तव्य असलेल्या भागातील वातावरणात सोडते. या गंधाकडे त्या परिसरातील नर जातीचा सर्प आकर्षित होऊन ...

ठळक मुद्दे मादीची जागा मिळविण्यासाठी प्रणयपुर्व झुंज सर्पांना असुरक्षिततेची जाणीव झाल्यास त्यांच्याकडून दंश होऊ शकतो. दोन नरांमध्ये सुरू असलेली विजय-पराजयाची झुंज नागरिकांनासर्पांचे मीलन वाटते

नाशिक : सध्या उन्हाळा तापला असून हा काळ सर्पांच्या विविध प्रजातींचा प्रणयाचा मानला जातो. सर्प हा असा एकमेव सरपटणारा प्राणी आहे, की त्याला कुठल्याही प्रकारचा आवाज नसतो. त्यामुळे प्रणयाची इच्छा पुर्ण करण्यासाठी मादी नैसर्गिकरित्या एकप्रकारचा गंध वास्तव्य असलेल्या भागातील वातावरणात सोडते. या गंधाकडे त्या परिसरातील नर जातीचा सर्प आकर्षित होऊन मादिचा शोध घेतो. यावेळी त्या भागात एकापेक्षा अधिक नर जातीचे सर्प असल्यास त्यांच्यात मादीची जागा मिळविण्यासाठी प्रणयपुर्व झुंज पहावयास मिळते. नाशिकमधील हनुमानवाडी भागात अशाच प्रकारे थक्क करणारी धामण प्रजातीच्या सर्पांची झुंज बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.नर सर्प एकमेकांशी झुंज देऊन परस्परांना पराजित करण्याचा प्रयत्नात असतात. अशी झुंज नैसर्गिक नाल्याच्या काठावर, गवताळ भागात, अडगळीच्या ठिकाणी नजरेस पडते अन् तेथे नागरिकांची गर्दी जमते. मुळात ही दोन नरांमध्ये सुरू असलेली विजय-पराजयाची झुंज असते; मात्र नागरिकांना ते सर्पांचे मीलन वाटते आणि विविध अंधश्रध्दा व गैरसमाजापोटी बघ्यांची गर्दी वाढत जाते तर काही लोक पांढरा किंवा लाल कपडा शोधत त्या सर्पांच्या अंगावर फेकण्याचा प्रयत्न करतात; अशावेळी हा प्रयत्न त्यांच्या अंगावरही बेतू शकतो. त्यामुळे नागरिकांनी असा कुठलाही प्रयत्न यावेळी न केलेला बरा. कारण दोन्ही नर सर्पांमध्ये एकमेकांना पराजय करण्यासाठी आक्रमकता वाढलेली असते, अशावेळी त्यांना नागरिकांच्या अशा कापड फेक किंवा फोटोसेशनसाठी डिवचणे महागात पडू शकणारे आहे. सर्पांना असुरक्षिततेची जाणीव झाल्यास त्यांच्याकडून दंश होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अशावेळी सर्पांभोवती गर्दी करणे टाळावे, असे आवाहन इको-एको फाऊण्डेशनचे सदस्य व सर्प अभ्यासक अभिजीत महाले यांनी केले आहे. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवNashikनाशिक