उज्जैनच्या जागेसाठी नाशिकची शिफारस

By Admin | Updated: September 22, 2015 00:01 IST2015-09-22T00:01:28+5:302015-09-22T00:01:36+5:30

कुंभमेळा : वाढीव जागेच्या दाखल्यासाठी आग्रह

Nasik recommended for Ujjain's place | उज्जैनच्या जागेसाठी नाशिकची शिफारस

उज्जैनच्या जागेसाठी नाशिकची शिफारस

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आलेल्या आखाडे, खालशांनी अंतिम पर्वणी आटोपल्यानंतर प्रस्थानाला सुरुवात केली असली तरी, जाताना नाशिकच्या साधुग्राममध्ये मिळालेल्या जागेपेक्षा अधिक जागेचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी प्रशासनाच्या मागे लकडा लावला आहे.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आलेल्या आखाडे, खालशांसाठी प्रशासनाने तपोवनातील साधुग्राममध्ये सव्वा तीनशे एकर जागेवर साधुग्राम साकारत प्रमुख आखाडे वगळता प्रत्येक खालशांसाठी चारशे चौरस मीटरचे प्लॉट तयार केले होते. या प्लॉटवरच पाणी, स्वच्छतागृह व न्हानीघराची व्यवस्था करण्यात आली होती. रिकाम्या प्लॉटवर संबंधित खालशांनी आपल्यापरीने मंडप उभारणी करून साधारणत: दीड महिने वास्तव्य केले. कुंभमेळ्याच्या तिन्ही पर्वण्या पार पडल्यानंतर आता साधू-महंतांना उज्जैनच्या कुंभमेळ्याची आस लागल्याने त्यांनी आपले बस्तान आवरण्यास सुरुवात केली आहे. तथापि, यापूर्वी प्लॉटवाटप करताना जिल्हा प्रशासनाकडून त्यांना देण्यात आलेल्या वाटप पत्राऐवजी अधिक जागा दिल्याचा दाखला मिळावा, असा आग्रह साधू-महंतांकडून धरला जात आहे. नाशिकला चारशे चौरस मीटर इतकी जागा प्रशासनाकडून देण्यात आली असल्याने उज्जैनमध्येही तेथील प्रशासनाकडून तितकीच जागा मिळेल, अशी भीती त्यांना वाटत असून, चारशेऐवजी एक हजाराच्या पुढे चौरसमीटर जागा देण्यात आली होती, असा दाखला प्रशासनाने द्यावा यासाठी आग्रह धरला जात आहे.

Web Title: Nasik recommended for Ujjain's place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.