शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

‘स्वच्छ सर्वेक्षण’च्या निकालाकडे नाशिकची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 6:52 PM

महापालिका : कामगिरी उंचावण्याबाबत आशादायी

ठळक मुद्देजानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यतायंदा ४०४१ शहरांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

नाशिक : शहरांमध्ये स्पर्धेची भावना निर्माण करणे व शहरी क्षेत्रांमध्ये स्वच्छता सुनिश्चित करण्यावर भर देणे, या उद्देशाने केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, निकालाकडे नाशिक महापालिकेसह सत्ताधारी भाजपाचेही लक्ष लागून आहे. यंदा गत वर्षाच्या तुलनेत कामगिरी उंचावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.गेल्या तीन वर्षांपासून केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबविली जात आहे. पहिल्या वर्षी, देशभरातील ७३ शहरांमध्ये तर दुसऱ्या वर्षी ४३४ शहरांमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. यंदा ४०४१ शहरांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या वर्षी नाशिक शहराचा देशभरातील ७३ शहरांमध्ये ३१ वा क्रमांक आला होता तर मागील वर्षी ४३४ शहरांच्या यादीत नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेले होते. खतप्रकल्पाचे केलेले खासगीकरण, नव्याने धावणाºया घंटागाड्या, गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी अभियान, स्वच्छ भारत अभियानांतर्गत उभारण्यात आलेली साडेसहा हजार शौचालये यामुळे नाशिकचा पहिल्या दहा ते वीस शहरांच्या यादीत क्रमांक लागेल, असा दावा प्रशासनाकडून छातीठोकपणे केला जात होता. नाशिकच्या अगोदर नवी मुंबई- ८, पुणे- १३, बृहन्मुंबई- २९, शिर्डी- ५६, पिंप्री चिंचवड- ७२, चंद्रपूर- ७६,अंबरनाथ- ८९, सोलापूर- ११५, ठाणे- ११६, धुळे- १२४, मीरा-भार्इंदर- १३०, नागपूर- १३७, वसई विरार- १३९, इचलकरंजी- १४१ या शहरांचा क्रमांक लागला होता. मागील वर्षी क्रमांकात घसरण झाल्यानंतर दत्तक घेतलेल्या नाशिकची सन २०१८ मध्ये होणा-या स्पर्धेत कामगिरी उंचावली पाहिजे, असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरला होता. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने सहा महिने अगोदरच तयारी सुरू केली होती. स्वच्छ सर्वेक्षणाबाबत जागृतीवर भर देण्यात आला होता. सत्ताधारी भाजपाकडूनही मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. मागील वर्षी ४ मे रोजी स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल जाहीर झाला होता. यंदा मात्र, निकालाला उशीर झाला असून निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. यंदा, गतवेळच्या तुलनेत कामगिरीत नक्कीच सुधारणा होईल, असा दावा प्रशासनातील अधिकाºयांकडून केला जात आहे.सत्ताधा-यांची प्रतिष्ठा पणालामागील वर्षी महापालिकेची सार्वजनिक निवडणूक होऊन भाजपा सत्तेवर आली. मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकचा १५१ वा क्रमांक आल्यानंतर सत्तेत आलेल्या भाजपाने सदर स्पर्धा मनसेच्या सत्ताकाळात झाल्याचे सांगत त्यातून आपली मान सोडवून घेतली होती. यंदा मात्र, भाजपा सत्ताकाळात सर्वेक्षण झाले आहे. त्यातच मुख्यंमत्र्यांनी गतवर्षाच्या तुलनेत कामगिरी उंचावण्याचा आग्रह धरलेला आहे. त्यामुळे, सत्ताधारी भाजपाच्या दृष्टीने यंदाचा निकाल हा प्रतिष्ठेचा बनला असून निकालाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान