नाशिक, स्वाइन फ्लूचा सर्वाधिक फैलाव
By Admin | Updated: February 25, 2015 00:30 IST2015-02-25T00:28:51+5:302015-02-25T00:30:37+5:30
नाशिक, स्वाइन फ्लूचा सर्वाधिक फैलाव

नाशिक, स्वाइन फ्लूचा सर्वाधिक फैलाव
नाशिक : संपूर्ण विभागात नाशिक आणि धुळे या दोन जिल्'ांतच स्वाइन फ्लूचा सर्वाधिक फेलाव असल्याचे विभागातील आकडेवारीवरून स्पष्ट होत असून, या जिल्'ांमध्ये या रोगाबाबत माहिती, मार्गदर्शन, रुग्ण तपासणी, उपचार तसेच औषधसाठा उपलब्ध असल्याची माहिती नाशिक परिमंडळ आरोग्य सेवा सहसंचालक पांडुरंग बुरुटे यांनी दिली़ दरम्यान, नाशिक जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात सात, तर खासगी रुग्णालयात एक संशयित रुग्ण उपचार घेत असून, जिल्हा रुग्णालयातील तिघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे़ नाशिक विभागात नाशिक जिल्'ाखालोखाल धुळे जिल्'ात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत़ १ जानेवारी ते २३ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत संपूर्ण नाशिक विभागात (अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक) ६२०१ रुग्णांची तपासणी करण्यात आली, तर ५०७ रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत़ यामध्ये शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांपैकी ३४ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत़ त्यापैकी २१ रुग्ण उपचार घेत असून, विभागात या रोगामुळे आतापर्यंत ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ नाशिक विभागात सर्वाधिक रुग्णांची तपासणी नाशिक जिल्'ातच करण्यात आली आहे़ त्यामध्ये नाशिक महापालिकेची रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, मालेगाव महापालिका हद्दीतील रुग्णालयांचा समावेश आहे़ नाशिक जिल्'ात ६०४४ नागरिकांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी ३५० रुग्णांना टॅमी फ्लूची गोळ्या देण्यात आल्या़ तसेच ३२ रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह, २१ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत सहा रुग्णांचा जीव गेला आहे़ स्वाइन फ्लूने आतापर्यंत नाशिक शहर व जिल्'ात सहा, तर धुळे जिल्'ातील एकाचा बळी घेतला आहे़(प्रतिनिधी)