आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी नाशिकच्या २ खेळाडूंची निवड
By Admin | Updated: May 25, 2014 16:36 IST2014-05-25T16:26:00+5:302014-05-25T16:36:35+5:30
नाशिक : योगविद्या गुरुकुलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगासन निवड स्पर्धेत विजयी ठरलेल्या नाशिकच्या दोन खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे़

आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी नाशिकच्या २ खेळाडूंची निवड
नाशिक : योगविद्या गुरुकुलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगासन निवड स्पर्धेत विजयी ठरलेल्या नाशिकच्या दोन खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे़
त्र्यंबकेश्वर येथील तळवडे येथे झालेल्या या निवड चाचणी स्पर्धेसाठी स्वानंदी वालझाडे, श्रृती ठोंबळे, श्रेया शिंदे, स्नेहा शिंदे, वेदांत अडसरे हे पात्र ठरले होते़ निवड चाचणी स्पर्धेत ९ ते १० वर्षे वयोगटात वेदांत अडसरे याने रौप्य तर ६ ते ८ वर्ष वयोगटात स्वानंदी वालझाडे हिने कांस्यपदक पटकावले़ या दोघांची मलेशिया येथे होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, २८ ऑगस्टला स्पर्धा होणार आहेत़
फ ोटो क्रमांक - 24 पीएचएमए01 - आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेले वेदांत अडसरे व स्वानंदी वालझाडे़ समवेत प्रशिक्षक दीपक उपासणी़