नाशिप्र मंडळाची वार्षिक सभा खेळीमेळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:15 IST2021-03-16T04:15:33+5:302021-03-16T04:15:33+5:30

नाशिक : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा जु.स. रुंगटा हायस्कूलमधील संस्थेच्या कार्यालयात डॉ. भरत केळकर यांच्या ...

Nashipra Mandal's annual meeting in full swing | नाशिप्र मंडळाची वार्षिक सभा खेळीमेळीत

नाशिप्र मंडळाची वार्षिक सभा खेळीमेळीत

नाशिक : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा जु.स. रुंगटा हायस्कूलमधील संस्थेच्या कार्यालयात डॉ. भरत केळकर यांच्या अध्यक्षतेत ऑनलाइन पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सर्वसाधारण सभेचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, संजय लोंढे यांच्यासह व्यासपीठावर कार्यकारी मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र कलाल, उपाध्यक्ष मारुती कुलकर्णी, खजिनदार अनिल दहिया, सहसचिव प्रसाद कुलकर्णी, मयूर कपाटे उपस्थित होते. संस्थेचे सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करीत २०१९-२०२० या वर्षाचा वार्षिक अहवाल सादर केला. खजिनदार अनिल दहिया यांनी २०२०-२०२१ या वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. त्याचप्रमाणे जमाखर्च तपासणीसाठी लेखापरीक्षक नियुक्तीसह अन्य विषयांना मंजुरी देण्यात आली.

===Photopath===

150321\15n_3_15032021_13.jpg

===Caption===

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभते अध्यक्ष  डॉ. भरत केळकर, समवेत  डॉ. सुनिल कुटे, संजय लोंढे डॉ. राजेंद्र कलाल, अश्विनीकुमार येवला आदी

Web Title: Nashipra Mandal's annual meeting in full swing