शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

नाशिक जिल्हा परिषदेतील फाईल्स ‘बोलू लागल्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 8:21 PM

जिल्हा परिषदेतील फाईल्स पेंडन्सी प्रकरणामुळे अवघ्या जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले असताना आणि फाईल्स बेकायदेशीर असल्याचा दावा करणाऱ्या  मीणा यांच्या बदलीनंतर जिल्हा परिषदेतील फाईल्स पूर्ण करण्याच्या कामाला गती आली आहे.

ठळक मुद्देअनिल लांडगे यांच्याकडे सध्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार ग्रामीण पाणीपुरवठा, ग्रामपंचायत, तसेच स्वच्छता विभागाच्या फाईल्सचा निपटारा

निपटारा सुरू : महत्त्वाच्या विभागांच्या फाईल्सवर तत्काळ तोडगानाशिक : जिल्हा परिषदेतील फाईल्स पेंडन्सी प्रकरणामुळे अवघ्या जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले असताना आणि फाईल्स बेकायदेशीर असल्याचा दावा करणाऱ्या  मीणा यांच्या बदलीनंतर जिल्हा परिषदेतील फाईल्स पूर्ण करण्याच्या कामाला गती आली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांच्याकडे सध्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार असून, त्यांनी फाईल्स निपटाऱ्याला प्राधान्य दिले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिते रजेवर गेले असले तरी कामकाजाला कोणताही ब्रेक लागला नसल्याचा दावा लांडगे यांनी केला आहे.अधिकारी आणि खातेप्रमुखांकडून मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या टेबलावर आणलेल्या फाईल्स या बेकायदेशीर तसेच यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी नाकारलेल्या असून, अशा फाईल्सवर कोणत्याही प्रकारे स्वाक्षरी न करण्याची भूमिका मीणा यांनी घेतली होती. त्यांच्या काळात जवळपास सर्वच विभागांच्या फाईल्स पडून होत्या. ‘टॉक’ म्हणजे चर्चा करा असा शेरा मीणा हे मारत असले तरी प्रत्यक्षात ते कुणाशीही चर्चा करीत नसल्याने फाईल्सचा कोणताही निर्णय होत नव्हता. विभागीय आयुक्त महेश झगडे यांनीदेखील फाईल्स निपटारा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही फाईल्सचा प्रवास थांबलेला होता. ‘टॉक’ म्हणून बंदिस्त झालेल्या किंवा एका कोपऱ्यात  पडलेल्या फाईल्स आता ‘बोलू लागल्या’ आहेत. या फाईल्सवर निर्णय घेऊन तोडगा काढला जात आहे.दरम्यानच्या काळात मीणा यांची बदली होऊन त्यांच्या जागी नवे मुख्य कार्यकरी अधिकारी म्हणून नरेश गिते यांनी पदभार स्वीकारला आहे. मात्र आपल्या खासगी कामानिमित्ताने  येत्या २२ तारखेपर्यंत रजेवर गेल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अनिल लांडगे हे सध्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहात आहेत. त्यांनी फाईल्स निपटारा करण्याच्या कामाला प्राधान्य दिले असून, आत्तापर्यत ग्रामीण पाणीपुरवठा, ग्रामपंचायत, तसेच स्वच्छता विभागाच्या फाईल्सचा निपटारा करण्यात आला आहे. लांडगे यांनी संबंधित विभागात जाऊन फाईल्सवर तातडीने निर्णय घेऊन कामे मार्गी लावली आहेत. तर आता शिक्षण विभागाच्या फाईल्सची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. महत्त्वाच्या विभागांच्या खात्यांच्या फाईल्स पडू न देता त्यावर तत्काळ निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावला जात आहे. फाईल्सची कामे थांबली नाही तर आता वेगाने सुरू असल्याचे लांडगे यांनी सांगितले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashikनाशिक