शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

सुख, दु:खात वृक्षांची रोपे होणार साक्षीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 17:12 IST

नाशिक : राज्यातील वनक्षेत्र कमी झाल्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सहभाग नोंदवावा यासाठी ‘हरित महाराष्ट्र  अभियान’अंतर्गत ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ हा समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, यामध्ये मानवाशी निगडीत आयुष्यातील कोणत्याही प्रसंगात वृक्षांची रोपे देऊन भावना व्यक्त करण्याचे आदेश आता शासनानेच काढले आहेत.

ठळक मुद्देशासनाचे आदेश : ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ योजनाशुभेच्छा वृक्ष, शुभमंगल वृक्ष, आनंदवृक्ष, माहेरची झाडी, आणि स्मृती वृक्ष अशी संकल्पना

नाशिक : राज्यातील वनक्षेत्र कमी झाल्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सहभाग नोंदवावा यासाठी ‘हरित महाराष्ट्र  अभियान’अंतर्गत ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ हा समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, यामध्ये मानवाशी निगडीत आयुष्यातील कोणत्याही प्रसंगात वृक्षांची रोपे देऊन भावना व्यक्त करण्याचे आदेश आता शासनानेच काढले आहेत.राज्यातील वनक्षेत्र २० टक्क्यांवरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी शासनाच्या हरित महाराष्ट्र अभियान या महत्त्वाकांशी उपक्र मांतर्गत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ ही योजना ग्रामविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. याबाबत नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत सर्व ग्रामपंचायतीमध्ये योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत.जागतिक उष्ण तपमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋतू बदल, पाण्याचे दुर्भिक्ष, अतिवृष्टी, पूर इत्यादी नैसिर्गक आपत्तींवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी वृक्षलागवडीचा भरीव कार्यक्र म शासनाने हाती घेतला आहे. यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग घेण्यात येणार आहे. यामध्ये शुभेच्छा वृक्ष, शुभमंगल वृक्ष, आनंदवृक्ष, माहेरची झाडी, आणि स्मृती वृक्ष अशी संकल्पना आखण्यात आली आहे.शुभेच्छा वृक्ष म्हणजे गावात जन्माला येणाºया बालकांच्या जन्माचे स्वागत संबंधित कुटुंबाला फळझाडांची रोपे देऊन करावे, शुभमंगल वृक्ष म्हणजे, दरवर्षी गावातील ज्यांचे विवाह होतील त्यांना फळझाडांची रोपे देण्यात यावेत, आनंवृृक्ष म्हणजे, दरवर्षी गावातील जे विद्यार्थी दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण होतील, नोकºया मिळतील, जे उमेदवार विविध निवडणुकांमध्ये विजयी होतील अशा आनंदाच्या क्षणी त्यांना फळझाडाची रोपे देऊन शुभेच्छा दाव्यात, माहेरची झाडी म्हणजेच गावातील विवाहित मुलींच्या माहेरच्या लोकांनी त्यांना फळझाडांची रोपे देऊन शुभाशीर्वाद द्यावेत आणि स्मृती वृक्ष म्हणजे, गावातील एखाद्या व्यक्तीचे वर्षभरात निधन झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांना फळझाडाची रोपे देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात यावी. अशी संकल्पना शासनाने मांडली आहे.सदर रोपांच्या संगोपनासाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने अभिनव योजना राबविण्यात येणार असून, ग्रामपंचायतीनी १ जुलै ते चालू वर्षाचे ३० जून हे वर्ष गृहीत धरून जन्म, विवाह, मृत्यू यानुसार अंदाजपत्रक तयार करून १ जुलै रोजी एकदाच रोपांचे वाटप करावयाचे आहे. याची नोंद ग्रामपंचायतीच्या रजिस्टरमध्ये करावयाची आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना  दिले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद