शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

आरे वृक्षतोड प्रकरणी ‘आम्ही नाशिककर’कडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 18:02 IST

नाशिक : मुंबईतील आरे कॉलनीतील वृक्षतोडीविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून विरोध केला जात असतानाही न्यायालयाच्या निर्णयानंतर एका रात्रीत ...

नाशिक : मुंबईतील आरे कॉलनीतील वृक्षतोडीविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून विरोध केला जात असतानाही न्यायालयाच्या निर्णयानंतर एका रात्रीत बेसुमार वृक्षतोड करण्यात आलीच शिवाय विरोध करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आल्याने या घटनेचा ‘आम्ही नाशिककर’ या पर्यावरणप्रेमी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकीत आरे कॉलनीतील झाडे नष्ट करण्याच्या प्रकाराला विरोध करण्यासाठी नाशिकमध्ये मोहीम राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मेट्रो कार शेडसाठी गोरेगावमधील आरे कॉलनीत वृक्षतोड न करता सदर प्रकल्प अन्यत्र हलवावा, अशी मागणी करीत पर्यावरणप्रेमी नागरिकांनी लढा उभारलेला आहे. या संदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर रात्रीतून हजारो वृक्षांवर कुºहाड चालविण्यात आली. पर्यावरण प्रेमींना तेथे पोहचता येऊ नये म्हणून कलम १४४ लावण्यात आले, मोठ्या प्रमाणात पोलीस बल तैनात करण्यात आले होते.पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या पाठीशी उभे राहत नाशिकमधील पर्यावरणप्रेमी संस्था ‘आम्ही नाशिककर’ यांच्या वतीने याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये वृक्षतोडीचा निषेध करण्यात येऊन आंदोलकांच्या भूमिकेचे समर्थन करण्यात आले. याप्रकरणी आता येत्या २१ तारखेला सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुढील निर्णय होईपर्यंत सदर वृक्षतोड थांबली आहे. राज्य सरकारने आणि एमएमआरडीने ज्याप्रकारे अत्यंत हेकेखोरपणा दाखवत रात्रीतून वृक्षांवर घाव घातले त्याचा निषेध करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देण्यात आले. याप्रसंगी स्वातंत्र सैनिक संघटनेचे वसंतराव हुदलीकर, पर्यावरण सल्लागार एन. एम. भामरे, मूलभूत हक्क आंदोलनाच्या वासंती दीक्षित, लोकाधार संस्थेचे वासंती दीक्षित, मुकुंद दीक्षित, श्रीधर देशपांडे आदी उपस्थित होते.(फोटो:आर:१०निशीकांत)

टॅग्स :Nashikनाशिकenvironmentपर्यावरण