शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी वसुलीसाठी आता अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 22:53 IST

नाशिक : थकीत पाणीपट्टीमुळे संबंधित ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा रद्द करण्याचे जाहीर करूनही पाणीपट्टी भरण्याला अपेक्षित गती नसल्याने आता मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी पुन्हा एकदा ग्रामपंचायतींना अल्टिमेटम दिला आहे.थकीत पाणीपट्टीमुळे नांदगाव शहर व ५६ खेडी पाणीपुरवठा योजना तसेच दाभाडी १२ गाव पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. याबाबत झालेल्या आढावा ...

ठळक मुद्देजिल्हा परिषद : ग्रामसेवकांना गिते यांनी खडसावलेमसेवक यांची आढावा बैठक घेऊन सूचना

नाशिक : थकीत पाणीपट्टीमुळे संबंधित ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा रद्द करण्याचे जाहीर करूनही पाणीपट्टी भरण्याला अपेक्षित गती नसल्याने आता मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी पुन्हा एकदा ग्रामपंचायतींना अल्टिमेटम दिला आहे.थकीत पाणीपट्टीमुळे नांदगाव शहर व ५६ खेडी पाणीपुरवठा योजना तसेच दाभाडी १२ गाव पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. याबाबत झालेल्या आढावा बैठकीत सर्व ग्रामपंचायतींनी टप्प्याटप्प्याने थकीत पाणीपट्टी भरण्याचे मान्य केल्याने २४ आॅगस्टपासून सदरचा पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले. या तिन्ही योजनांतून आतापर्यंत दीड कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.नांदगाव शहर व ५६ खेडी पाणीपुरवठा योजना तसेच दाभाडी १२ गाव पाणीपुरवठा योजनांचा पाणीपुरवठा थकीत पाणीपट्टीमुळे गेल्या १६ आॅगस्टपासून खंडित करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेऊन पाणीपट्टी भरण्याच्या सूचना दिल्या.गावातील पाणीपट्टी वसूल करून जिल्हा परिषदेला भरण्याचे ग्रामसेवकांना बंधनकारक असूनदेखील त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच पाणीपेट्टी थकीत राहण्याचे प्रमाण वाढले असल्याने यापुढे याबाबत ग्रामसेवकांना जबाबदार धरणार असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले. नांदगाव व मालेगाव तालुके दुष्काळग्रस्त असल्याने टप्प्याटप्प्याने पाणीपट्टी भरण्यासाठी मुदत देण्याचे सरपंच यांनी यावेळी सांगितले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २५ टक्के थकबाकी भरून उर्वरित रक्कम विहित मुदतीत भरण्याचे आदेश डॉ. गिते यांनी दिले. तसेच १६ आॅगस्टपासून खंडित करण्यात आलेला पाणीपुरवठा शुक्र वार (दि. २४) पासून पूर्ववत सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले. यावेळी उपकार्यकारी अभियंता ए. एन. पाटील, उपअभियंता प्रकाश बोरसे उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकRural Developmentग्रामीण विकास