दुचाकी अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 16:59 IST2017-11-28T16:47:42+5:302017-11-28T16:59:03+5:30

दुचाकी अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू
नाशिक : दोन दुचाकींच्या अपघातात जखमी झालेल्या युवकाचा मंगळवारी (दि़२८) सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला़ सैफ समीर सय्यद (१८, रा़ सारडा सर्कल, नाशिक) असे अपघातात मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे़
मुंबई नाका पोलीस ठाण्यात तौकीर मनिरुद्दीन सय्यद (३८, ड्रिम व्हिला, शिंगाडा तलाव, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा पुतण्या सैफ सय्यद हा रविवारी (दि़२६) रात्री दहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच १५, एफडी १७८२) पखालरोडने द्वारकाकडे जात होता़ यावेळी पखालरोडने द्वारकाकडे भरधाव येत असलेल्या बजाज पल्सर दुचाकीस्वाराने (एमएच १५, ईआर ४६५०) सैफच्या दुचाकीला धडक दिली़
यामध्ये सैफचे डोके व छातीस गंभीर मार लागल्याने त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी (दि़२८) सकाळी मृत्यू झाला़ या प्रकरणी तौकिर सय्यद यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलिसांनी पल्सर दुचाकीचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़