लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महिनाभरापूर्वी गोळे कॉलनीतून चोरी झालेली फोक्स वॅगन कार व चोरट्यांचा शोध घेण्यात सरकारवाडा पोलिसांना यश आले आहे़ कार चोरणाºया दोन अल्पवयीन गुन्हेगारांना पोलिसांनी पपया नर्सरी परिसरातून ताब्यात घेतले आहे़सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी येथील भालचंद्र यशवंत पाटील हे पेशाने शिक्षक असून, त्यांची फोक्स वॅगन कार (एमएच १५, इपी ५९८३) चोरट्यांनी गोळे कॉलनी परिसरातून ११ जुलै रोजी चोरून नेली होती़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात कारचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ सरकारवाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक टी़ एम़ राठोडे यांना या कारबाबत गुप्त माहिती मिळाली होती़पोलिसांनी सोमवारी (दि़७) दुपारी चार वाजेच्या सुमारास त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरीजवळ सापळा रचून दोन अल्पवयीन गुन्हेगारांना कारसह अटक केली़ या दोघांकडून शहरातील आणखी वाहन चोरीच्या घटनांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी या पथकाचे कौतुक केले आहे.
दोन अल्पवयीनांकडून चोरीची कार हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 22:28 IST
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महिनाभरापूर्वी गोळे कॉलनीतून चोरी झालेली फोक्स वॅगन कार व चोरट्यांचा शोध घेण्यात सरकारवाडा पोलिसांना यश आले आहे़ कार चोरणाºया दोन अल्पवयीन गुन्हेगारांना पोलिसांनी पपया नर्सरी परिसरातून ताब्यात घेतले आहे़सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी येथील भालचंद्र यशवंत पाटील हे पेशाने शिक्षक असून, त्यांची फोक्स वॅगन कार (एमएच ...
दोन अल्पवयीनांकडून चोरीची कार हस्तगत
ठळक मुद्देमहिनाभरापूर्वी गोळे कॉलनीतून चोरी त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरीजवळ सापळा