औरंगाबाद रोडवर दोन चारचाकींची समोरासमोर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 17:03 IST2017-12-02T17:03:36+5:302017-12-02T17:03:50+5:30

औरंगाबाद रोडवर दोन चारचाकींची समोरासमोर धडक
नाशिक : इनोव्हा व मालवाहू पिकअप यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत एका वाहनाचा चालक जखमी झाल्याची घटना शनिवार (दि.२) पहाटे आडगाव शिवारातील कमोद पेट्रोलपंप चौफुलीवर घडली़ या अपघातामध्ये वाहतूक सिग्नलच्या पोलचे मोठे नुकसान झाले आहे़
आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास चौफुलीवरून इनोव्हा कारचा चालक व दूध घेऊन जात असलेल्या पिकअपचा वाहनचालक हे रस्ता ओलांडत असताना त्यांची समोरासमोर धडक झाली़ या धडकेनंतर ही दोन्ही वाहने रस्त्यावरच उलटली़ यामध्ये एका वाहनातील चालक वाहनाखाली दाबला गेला होता़ या अपघातात नागरिकांनी वाहनात अडकलेल्या व किरकोळ जखमी झालेल्या वाहनाचालकास बाहेर काढून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़
दरम्यान, या अपघाताची आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.