नाशिकमध्ये तीन महिलांचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 18:44 IST2017-12-03T18:44:37+5:302017-12-03T18:44:42+5:30

nashik,Three,women,molested | नाशिकमध्ये तीन महिलांचा विनयभंग

नाशिकमध्ये तीन महिलांचा विनयभंग

ठळक मुद्देपंचवटी, मुंबई नाका व नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत घटना

नाशिक : शहरातील पंचवटी, मुंबई नाका व नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
पंचवटीतील कौशल्यानगर परिसरात राहणाºया एका पंचवीस वर्षीय महिलेच्या घरास घुसून संशयित नितेश रमेश शिरसाठ (रा. घारपुरे घाट) याने विनयभंग केला़ या दरम्यान पीडित महिलेची आई वाचविण्यासाठी आली असता दोघींनाही शिवीगाळ करीत पुन्हा येईन, अशी धमकीही शिरसाठ याने दिली़ या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई नाक्यावरील भाभानगर परिसरात राहणाºया एका महिलेच्या घरी शनिवारी (दि़२) दुपारच्या सुमारास तिचे नातेवाईक संशयित साजिया व तिचा भाऊ नासिर पटेल व त्याचा मित्र जाकरिया आणि एक अज्ञात इसम (सर्व रा़ नरहरीनगर, जेलरोड) आले व कारण नसताना शिवीगाळ केली़ तसेच महिलेने नातवास घेऊन जाण्यास विरोध केला असता संशयितांनी महिलेचा विनयभंग केला़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिकरोडच्या शांतीपार्कमधील घर खाली करून घेण्याच्या उद्देशाने तिघा संशयितांनी एका महिलेला शिवीगाळ व दमदाटी करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे़ पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ७ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत संशयित सिद्धार्थ पगारे, शोभा पगारे व मीनाक्षी भालेराव (सर्व रा़ करुणा अपार्टमेंट, नाशिकरोड) हे घरी आले व घर खाली करून घेण्याच्या उद्देशाने वाद उपस्थित करून शिवीगाळ व दमदाटी केली़ तर संशयित सिद्धार्थ पगारे याने विनयभंग केला़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: nashik,Three,women,molested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.