जिल्ह्यातील ८०० शेतकरी पहिल्या यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 08:06 PM2020-02-24T20:06:30+5:302020-02-24T20:07:59+5:30

नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी राज्य सरकारने जाहीर केली असून, पहिल्या यादीत नाशिक जिल्ह्यातील ...

nashik,the,first,list,of,six,farmers,in,the,district | जिल्ह्यातील ८०० शेतकरी पहिल्या यादीत

जिल्ह्यातील ८०० शेतकरी पहिल्या यादीत

Next
ठळक मुद्देकर्जमुक्ती योजना : सोनांबे, चांदोेरीतील शेतकऱ्यांना लाभ

नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी राज्य सरकारने जाहीर केली असून, पहिल्या यादीत नाशिक जिल्ह्यातील सोनांबे आणि चांदोरी या दोन गावांमधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. या दोन्ही गावांतील ७७८ पात्र शेतकºयांची यादी पोर्टलवर जाहिर करण्यात आली असून जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार शेतकºयांना योजनेचा लाभ होणार आहे. योजनेतील दुसरी यादी २८ तारखेला जाहिर केली जाणार आहे.
दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकºयांचे कर्जमाफ करण्याच्या कर्जमुक्ती योजनेंतर्गत मुख्यमंत्र्यांनी मुंबईतून राज्याची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सोनांबे आणि निफाड तालुक्यातील चांदोरी गावांमधील शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ पहिल्या टप्प्यात दिला जाणार आहे. या दोन्ही गावांतील शेतकºयांचे आधार प्रमाणिकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरणाचे काम आपले सरकार केंद्रांवर व संबंधित बॅँकांच्या शाखेत करण्यात येत आहे. ज्यांचे प्रमाणिकरण झाले आहे त्यांना प्रमाणपत्र देखील दिले जात असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी दिली. येत्या दोन दिवसांत शेतकºयांच्या कर्जखात्यात कर्जमुक्ती योजनेची दोन लाखांची रक्कम जमा होणार आहे.
कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार १०७ लाभार्थ्यांपैकी सुमारे सात हजार बॅँक कर्जदारांची खाती आधारलिंक नसल्याने त्यांचे खाते आधार लिंक करण्याची व्यापक मोहीम राबविण्यात आली. महसूल यंत्रणेवर आधारलिंक करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

Web Title: nashik,the,first,list,of,six,farmers,in,the,district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.