प्राथमिक शिक्षकांवरच निवडणूक कामाचा बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 03:01 PM2019-07-24T15:01:43+5:302019-07-24T15:02:40+5:30

नाशिक : निवडणुकीच्या राष्ट्रीय य कार्यात सहभाग आवश्यक असल्याने सदर कामे प्राथमिक शिक्षक वर्षानुवर्ष करीत आहेत. परंतु बीएलओ म्हणून कामकाज ...

nashik,the,burden,of,election,work,on,primary,teachers | प्राथमिक शिक्षकांवरच निवडणूक कामाचा बोजा

प्राथमिक शिक्षकांवरच निवडणूक कामाचा बोजा

Next

नाशिक: निवडणुकीच्या राष्ट्रीय य कार्यात सहभाग आवश्यक असल्याने सदर कामे प्राथमिक शिक्षक वर्षानुवर्ष करीत आहेत. परंतु बीएलओ म्हणून कामकाज करतांना फक्त प्राथमिक शिक्षकांनाच मोठ्या प्रमाणात कामे दिले जातात तर काही शाळांना शंभर टक्के या प्रक्रियेतून वगळले जाते. प्राथमिक शिक्षकांची संख्या आणि शैक्षणिक कामकाजाची आवश्यकता लक्षात घेता प्राथमिक शिक्षकांवरी बीएलओ म्हणून देण्यात येणारा भार कमी करण्यात यावा अशाी मागणी खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
या संदर्भात निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांना देण्यात आलल्या निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक व बीएलओ च्या कामकाजासंदर्भात शिक्षकांना नियुक्त करतांना संबंधित विद्यालयातील शिक्षकांची संख्या बघता आवश्यक तेव्हढेच शिक्षक निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात यावेत अशी महत्वपुर्ण मागणी महासंघाकडून मांडण्यात आली. शिक्षकांची संख्या कमी झाली तर शिक्षणक्रमावर त्याचा परिणाम होतो त्यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी नियोजन करावे अशी मागणी करण्यात आली आहे. दुसरी बाब म्हणजे निवडणूक शाखेकडून काही शाळांना आणि शिक्षकांना वर्षानुवर्ष निवडणुकीच्या कामकाजासाठी घेतले जाते. परंतु काही शाळांना शंभर टक्के सूट दिली जाते. यामुळे हा प्राथमिक शिक्षकांवर अन्याय असल्यची बाब निवेदनात स्पष्ट करण्यात आली आहे.

Web Title: nashik,the,burden,of,election,work,on,primary,teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.