शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शालेय शिष्यवृत्ती परीक्षेला अजूनही प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 13:39 IST

महाराष्ट्र  शासनाच्या शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या  पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व अजूनही कायम असून, गेल्या १८ तारखेला झालेल्या परीक्षेत जिल्ह्यातून सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील २७७ केंद्रांवर सदर परीक्षा घेण्यात आली होती.

ठळक मुद्दे४२ हजारविद्यार्थी: इयत्ता पाचवीचे सर्वाधिक विद्यार्थीजिल्ह्यातील २७७ केंद्रांवर सदर परीक्षा घेण्यात आली

नाशिक : महाराष्ट्र  शासनाच्या शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या  पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व अजूनही कायम असून, गेल्या १८ तारखेला झालेल्या परीक्षेत जिल्ह्यातून सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील २७७ केंद्रांवर सदर परीक्षा घेण्यात आली होती.शिक्षण परिषदेच्या अधिपत्याखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा गेल्या १८ रोजी घेण्यात आली. इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातून २४,७५८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, तर २४,१२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १५३ परीक्षा केंद्रांवर सदर परीक्षा घेण्यात आली. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातून १९,०५२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. मात्र १८,५५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, देवळा, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, मालेगाव, नांदगाव, नाशिक, निफाड, पेठ, सिन्नर, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, येवला, नाशिक मनपा आणि मालेगाव मनपामध्ये एकूण २७७ परीक्षा केंद्रांवर सदर परीक्षा घेण्यात आली. नाशिक महापालिका हद्दीत पाचवीच्या ३० तर आठवीच्या ५८ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. तर मालेगावमध्ये एकूण १३ केंद्रांवर दोन्ही वर्गाची परीक्षा घेण्यात आली. प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा, बुद्धिमत्ता चाचणी अशा विषयांची ही परीक्षा असून, शिष्यवृत्ती पात्रतेसाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान ४० टक्के गुण जिल्हानिहाय मजूर शिष्यवृत्तीच्या संचानुसार पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घोषित केले जाते.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थी